Viral Video Of Ramp Walk : वेगवेगळ्या फॅशनवीकमध्ये मॉडेल रॅम्पवर वॉक करताना आपल्याला दिसतात. या वॉकच्या वेळी त्यांचा एक वेगळा लूक पाहायला मिळत असतो. काही मॉडेल्स ग्लॅमरस लूकमध्ये तर काही थोड्या विअर्ड लूकमध्येही दिसतात. त्यांची चालण्याची (वॉक) स्टाईल, त्यांचे हावभाव अगदी पाहण्यासारखे असतात. तर पार्श्वभूमीवर एका मॉडलिंग शोचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कोणत्याही मोठ्या ब्रँडचा नसून गावाकडचा आहे. काय आहे या मॉडलिंग शोमध्ये खास, चला पाहूया…
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) गावाकडचा आहे. काही मुलं-मुलींना छान तयार करून एका रांगेत उभं केलं आहे आणि त्यांच्या कपड्यांवर पिवळ्या रंगाचा बिल्ला लावून त्यावर नंबर लिहिण्यात आले आहेत. प्रत्येक जण आपल्या रॅम्प वॉकची वाट पाहताना दिसत आहे. अशातच ‘फॅशन का है ये जलवा’ हे गाणं वाजतं आणि बिल्ल्यावर दोन क्रमांक लिहिलेल्या शीतल या चिमुकलीची एंट्री होते. तर चिमुकलीने कशाप्रकारे रॅम्प वॉक केला हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
फॅशन का है ये जलवा
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकली अगदी मॉडेलप्रमाणे रॅम्प वॉक करण्यास सुरुवात करते. तिने या रॅम्प वॉकसाठी खास स्कर्ट-टॉप, डोळ्यांवर गॉगल, पायात सँडल, व्हाईट सॉक्स, घातलेले असतात. गाणं लागताच कंबरेवर हात ठेवून चिमुकली रॅम्प वॉक करण्यास सुरुवात करते. पुढे चालत जाऊन फ्लाईंग किस देते. त्यानंतर पुन्हा मागे चालत येते, पुन्हा वळून बघते आणि जागेवर येऊन फ्लाईंग किस देते. हे पाहून उपस्थित सर्वच जण तिचे शिट्या व टाळ्या वाजवून कौतुक करतात.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sheetal_singh_verma’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मॉडलिंग शोच्या या अनोख्या कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी लावली आहे आणि चिमुकलीचा रॅम्प वॉक पाहून तेसुद्धा थक्क झाले आहेत. तसेच चिमुकलीचा रॅम्प वॉक करतानाचा आत्मविश्वास पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल एवढं नक्की…