Video Shows Little Girl Recreate Kareena Kapoor’s Oh My Darling Dance : करीना कपूर ही बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्या प्रत्येक चित्रपटात ती तिच्या एक्स्प्रेशन, ड्रेसिंग स्टाईल व डान्स स्टेप्सनी आजही ओळखली जाते. तिची अनेक आयकॉनिक गाणी किंवा एखादी भूमिका अनेक फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी आजही आवर्जून सादर केली जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एका चिमुकलीने करीना कपूरला मागे टाकत तिचे सुप्रसिद्ध गाणे अगदी खास स्टाईलमध्ये रिक्रिएट केले आहे.
व्हायरल व्हिडीओ उझबेकिस्तानमधला आहे. उझबेकिस्तानमधील एका लहान मुलीने करीना कपूरच्या आयकॉनिक गाण्यावर डान्स केला आहे. करीना कपूरच्या ‘ओह माय डार्लिंग’ गाण्यावर चिमुकलीने डान्स केला आहे. या चिमुकलीचे नाव नर्मिना स्कोडिवा असे आहे. तिने काळ्या रंगाचा टॉप, ब्ल्यू जीन्स आणि हुबेहूब करीनासारखे केससुद्धा बांधले आहेत. तिचे सुंदर हावभाव, तिच्या स्टेप्स, तिची ड्रेसिंग स्टाईल करीनापेक्षा खूप छान होती. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा चिमुकलीचा व्हिडीओ…
करीना कपूरला टक्कर देणारी कोणीतरी सापडली (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नर्मिना स्कोडिवाने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटातील ‘ओह माय डार्लिंग’ या गाण्यातील हुक स्टेप्स उत्तम प्रकारे करून दाखवल्या आहेत. तिच्या फूटवर्कपासून ते त्या आयकॉनिक हँड फ्लिक्सपर्यंत तिने करीनाला तोड देण्यात कोणतीही कमी ठेवलेली नाही आहे. तसेच तिचा या वयातील उत्साह पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत आणि या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @narmina_sodik या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. चिमुकलीचा व्हिडीओ पाहून अनेक जण “तू अगदी सारा अली खान व करीना कपूरसारखी दिसते आहेस”, असे म्हणताना दिसत आहेत. तर काही जण “तुझा डान्स बघून चेहऱ्यावर नकळत हसू आले”, “करीना कपूरला टक्कर देणारी कोणीतरी सापडली”, ‘अरे, करीना कपूरला छोटी मुलगीपण आहे का” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.