Viral Video Shows Girl Stuck Under A Rubble : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ (Viral Video ) सापडला. व्हिडीओत एक चिमुकली ढिगाऱ्याखाली अडकली आहे, असा दावा करत हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ गाझा पट्टीतील आहे असासुद्धा दावा करण्यात आला आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, हा व्हिडीओ गाझा पट्टीतील नाही आणि हा व्हिडीओ चिमुकलीच्या वडिलांनी काढला होता.

नेमकं काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर नदीम अहमदने त्याच्या @IamNadeem_A या प्रोफाईलवरून व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ढिगाऱ्याखाली अडकलेली पॅलेस्टिनीची चिमुकली मदतीची वाट पाहत आहे; किती हृदय पिळवटून टाकणारे दृश्य आहे, पण आंतरराष्ट्रीय समुदाय यावर गप्प आहे’.

Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Woman slaps Telugu actor NT Ramaswamy
Video: …अन् महिलेने भर गर्दीत अभिनेत्याला केली मारहाण, चित्रपट ठरला कारणीभूत; व्हिडीओ झाला व्हायरल
Viral video rickshaw driver writes interesting question on backside of rickshaw viral
VIDEO: पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? कोल्हापुरच्या रिक्षा चालकानं लिहलं भन्नाट उत्तर; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Man Found A Deadly King Cobra Inside A Sofa Pillow Cover Animal shocking rescue video
Video: भयंकर! उशीमध्ये लपला होता विषारी साप, डोकं टेकवताच काढला फणा; पुढे तरुणासोबत काय घडलं तुम्हीच पाहा
Delhi: Elderly Man Robbed At Knife Point By Bike-Borne Thieves On Pretext Of Asking Directions In Vivek Vihar
चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; वृद्ध व्यक्तीबरोबर भर दिवसा काय घडलं पाहा; VIDEO पाहून गोंधळून जाल
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Golgappa Vendors Arrested For Kneading Dough With Feet, Mixing Harpic 'For Taste' shocking video
पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पायाने पीठ मळून घेतले आणि नंतर टॉयलेट क्लिनर मिसळले; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

इतर युजर्सदेखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

हेही वाचा…VIRAL VIDEO : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हातात हात धरून नाचणारे आजी-आजोबा, रोमँटिक डान्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही टूलमधून मिळालेल्या स्क्रीनशॉटवरून शोध सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला अरबीमध्ये एक लेख सापडला, ज्यामध्ये मुलीचा स्क्रीनशॉट होता.

https://www.egy-press.com/38685

दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या लेखात म्हटले आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी सीरियाची आहे, गाझा पट्टीतील नाही. तसेच ती खेळत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.

अहवालात म्हटले आहे की, चिमुकलीच्या वडिलांनी सीरियातील त्यांच्या घरी स्वच्छ कपड्यांमध्ये खेळताना आणि मजा करताना लहान मुलीचे फोटो, व्हिडीओदेखील पोस्ट केले आहेत. या व्हिडीओला १,७२,००० लाइक्स आणि २८,००० शेअर्स मिळाले आहेत. या अकाउंटला १५ हजार लोक फॉलो करतात.

आम्हाला ही बातमी अरबी भाषेतील दुसऱ्या पोर्टलवरदेखील आढळली.

https://www.shorouknews.com/news/view.aspx?cdate=27102024&id=a4e98576-bd8d-4d6f-a92d-f9b8c7c24f27

आम्हाला शोरूक न्यूजच्या अधिकृत हँडलवर एक फेसबुक पोस्टदेखील सापडली.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=964980745672286&id=100064811078061&_rdr

वडिलांनी सोशल मीडिया युजर्सना तिचा व्हिडीओ शेअर करू नका, असे आवाहनही केले आहे.

निष्कर्ष :

ढिगाऱ्याखाली अडकलेली चिमुकली गाझा पट्टीतील असल्याचा दावा केला जात आहे, पण ती प्रत्यक्षात सीरियाची आहे. मुलगी खेळत असताना तिच्या वडिलांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. चिमुकली घरी सुरक्षित आहे आणि व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.