video shows little gir in audience danced to help her friend remember steps : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी खास मैत्रीण असते. आपल्या समस्या घरच्यांपेक्षा मैत्रिणीला सांगण्यात सुखदायक वाटते. कारण- ती सहसा आपल्या वयाची असते आणि तिनेसुद्धा कधीतरी आपल्यासारख्याच गोष्टींना तोंडदेखील दिलेले असते. त्यामुळे ती आपल्या समस्येतून मार्ग नाही काढू शकली तरी आपल्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेते. मग प्रत्येक संकटात ती आपल्याबरोबर असावी, असेच आपल्याला वाटू लागते. आज असेच एक उदाहरण दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ ( Video) पंजाबचा आहे. चंदिगडची रहिवासी, कन्टेंट क्रिएटर सुनिधी चौहान हिने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. ती उपस्थित असणाऱ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एक कार्यक्रम सुरू आहे. तसेच एक चिमुकली स्टेजवर डान्स सादर करते आहे. डान्स सादर करताना ती खूपच घाबरली आणि तिच्या डान्स स्टेप्ससुद्धा विसरली. पण, प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या तिच्या मैत्रिणीने तिच्या उत्साह वाढवला. एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला कशी मदत केली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

हेही वाचा…‘भीक मागण्यापेक्षा…’ उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणाऱ्या आईची गोष्ट; VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

व्हिडीओ नक्की बघा…

तिच्यासारखी एक मैत्रीण असावी :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिले असेल की, स्टेजवर ‘वो किस्ना है’ या गाण्यावर चिमुकली नृत्य सादर करते आहे. पण, कार्यक्रमाला जमलेल्या लोकांना पाहून ती थोडी घाबरते आणि स्टेप्स विसरून, इकडे-तिकडे पाहू लागते. पण, यादरम्यान प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या तिच्या मैत्रिणीने कमालच केली. ती अगदी स्टेजसमोर उभी असते. मैत्रीण तिला खाली उभी राहून डान्स स्टेप्स दाखवते आणि स्टेजवर असणारी दुसरी मैत्रीण त्या स्टेप्स बघून हुबेहूब तसे करू लागते आणि अशा प्रकारे तिचा डान्स पूर्ण होतो. मैत्रिणीने तिला स्टेप्सची आठवण करून देण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नृत्य करून तिचे काम थोडे सोपे केले. हे पाहून तुमच्याही आयुष्यात अशी एक मैत्रीण नक्कीच असावी, असे तुम्हालाही वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @_suniidhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मी नुकतंच या गोड मुलीला पूजेमध्ये पाहिलं, जी तिच्या मैत्रिणीला नाचण्यात मदत करताना दिसली. तिची मैत्रीण खूप घाबरली होती; पण दुसऱ्या मैत्रिणीनं स्टेजखाली उभं राहून तिला सगळ्या डान्स स्टेप्स दाखवल्या, ज्या बघून तिची मैत्रीण डान्स पूर्ण करू शकेल, ती एक उत्तम छोटी चीअरलीडर होती! माझी इच्छा आहे की, माझ्याकडेसुद्धा तिच्यासारखी एक मैत्रीण असावी,” अशी पुस्ती या व्हिडीओला देण्यात आली आहे.

Story img Loader