Little Girl Says Bye To Loco Pilot :ऑफिसला जाताना किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला गावी किंवा फिरायला जाताना आपण त्यांना बाय म्हणतो. तसंच लहानपणी एखादं विमान आकाशातून जाताना आपण सगळेच त्याला हात दाखवतो व बाय म्हणतो. ही लहानपणीच्या आठवणींतील सगळ्यात बेस्ट मूव्हमेंट आहे, असे म्हणायला हरकत नाही. एखाद्याला प्रवासाला जाताना ‘बाय’ म्हणण्यामुळे त्याचा प्रवास आणखीन सुखकर होऊ शकतो. म्हणूनच की काय ही प्रथा आजवर सुरूच राहिली आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका चिमुकलीने ट्रेनमध्ये उभ्या असलेल्या लोको पायलटला तिच्या स्टाईलमध्ये बाय केलं आहे.
रेल्वेस्थानकावरून ट्रेन सुटलेली असते आणि चालत्या ट्रेनमधून लोको पायलट झेंडा दाखवण्याचे कर्तव्य बजावत आहे, अशा दृश्याने व्हिडीओची सुरुवात होते. रेल्वे रुळांच्या पलीकडे एक आजोबा त्यांच्या नातीला घेऊन उभे आहेत. लोको पायलटला हिरवा झेंडा फडकवताना पाहून चिमुकलीच्या मनात काय येतं ते माहीत नाही? पण, ती त्यांच्याकडे बघून तिच्या इवल्याशा हाताने तिच्या स्टाईलमध्ये बाय म्हणण्याचा प्रयत्न करते. हे पाहून लोको पायलट काय करतात व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
लोको पायलटला ‘बाय’ म्हणणारी गोंडस चिमुकली :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आजोबांच्या कडेवर बसलेली चिमुकली लोको पायलटला पाहून बाय करते. तिच्या त्या बोलक्या कृतीकडे त्या लोको पायलटचे लक्ष जाते आणि तो हसत हसत तिच्याकडे पाहत झेंडा फडकवत बाय करताना दिसतो. लोको पायलट व चिमुकलीच्या चेहऱ्यावरील ते खुशीचे भाव पाहून आजोबा आपल्या नातीकडे कौतुकाने पाहतात. असा बराच वेळ लोको पायलट व चिमुकलीचा एकमेकांना बाय करताना दिसतात आणि व्हिडीओचा प्रेमळ शेवट होतो. ते पाहून तुमचेही मन नक्कीच द्रवेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ दक्षिण रेल्वेच्या @GMSRailway या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आनंद… रेल्वेस्थानकावरून ट्रेन सुटत असताना एका चिमुकलीनं लोको पायलटला बाय केलं. लोको पायलटनंही त्या चिमुकलीला हसून हिरवा झेंडा दाखवून प्रतिसाद दिला’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांच्या बालपणीच्या ‘ट्रेन प्रवासादरम्यान लोकांकडे हात हलवतात किंवा ऑनबोर्ड असलेल्यांना बाय म्हणण्याच्या आठवणींत रमून गेले.