Video Shows Girls Dance On Appadi Podu Song : सध्या डान्स शिकवण्यासाठी अनेक डान्स क्लास तर इन्स्टाग्राम रिल्सवर सुद्धा डान्सच्या स्टेप्स शिकवल्या जातात. पण, जेव्हा पूर्वी रिल्स, मोबाईलची क्रेझ नव्हती. तेव्हा मात्र आपण अनेकदा टीव्हीवर नवीन आलेले ते गाणे पाहायचो आणि मैत्रिणीबरोबर स्टेप्सचा सराव करायचो. तेव्हा डान्स क्लास नाही तर मैत्रिणीच एकमेकींच्या गुरु असायच्या. असाच एक क्षण आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मैत्रिणी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हाला तुमचे बालपण नक्कीच आठवेल.
तमिळ सुपरस्टार थलपती विजय व अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा एक जुना चित्रपट ‘घिल्ली’ मधील अपडी पोडे (Appadi Podu) हे गाणे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. या गाण्यावर बर्थडे पार्टी, लग्न किंवा एखादी वरात असेल तर अनेक जण आवर्जून डान्स करतात. तर आज या गाण्यावर दोन चिमुकल्या घरीच डान्स करत आहेत. व्हिडीओ शूट करण्यासाठी मोबाईल बेडवर लावून ठेवतात. त्यानंतर डान्स करण्यास सुरुवात करतात. आई चिमुकलींना पाहून खुदकन हसते आणि डान्स करण्यास सुरुवात करते. एकदा बघाच चिमुकलींचा जबरदस्त डान्स…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/reel/DIlF3qfp5qv/?igsh=eW95MHA5YW9qb3Mw
साऊथ इंडियन स्टाईलमध्ये केला जबरदस्त डान्स (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, दोन मैत्रिणी मिळून अपडी पोडे (Appadi Podu) या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्याचे ठरवतात. यासाठी एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी जाते. दोन्ही तरुणी मोबाईलवर बेडवर लावून व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि एकमेकींकडे कमालीच्या एनर्जीने डान्स करण्यास सुरुवात करतात. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये केलेला डान्स, दोघींचे हावभाव, त्यांच्या स्टेप्स, त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा आहे, जे पाहून घरात उपस्थित आई सुद्धा खुदकन हसली आणि इथेच व्हिडीओचा शेवट झाला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @poulomi_chattapadhay आणि @_m_o_u_12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या रिल्सची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे अनेक जण अभिनय, डान्स आणि गायन कौशल्ये दाखवून आपापले व्हिडीओ पोस्ट करत असतात. रिल्स आणि डान्स क्लासच्या वाढत्या ट्रेंडमध्ये आज या चिमुकलींनी घरीच डान्स करून आपल्या सगळ्यांच्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे असे म्हणायला हरकत नाही.