Viral Video Shows little Girls Playing Bhatukali : शाळेला सुट्टी पडली की चिमुकल्यांचा पिशवीत बांधून ठेवलेली खेळणी काढण्याचा आईकडे हट्ट सुरू होतो. मग सगळ्या मैत्रिणी एकत्र जमून, त्यांची मोजकी भांडी एकत्र करून खेळ खेळण्यास सुरुवात व्हायची. मग जोपर्यंत घरी ये असं आई ओरडून सांगायची नाही तोपर्यंत खेळ सुरूच. मातीची चूल किंवा खेळण्यातला गॅस, पानांची भाजी आणि गोल आकार देऊन केलेल्या पानांच्या पोळ्या, स्वयंपाकघरातील खेळण्यातील विविध भांडी आदी अनेक गोष्टी करण्यात मन रमून जायचं. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) गावाकडील आहे. तीन चिमुकल्या मिळून भांडीकुंडी खेळताना दिसत आहेत. एक चिमुकली भाजी विक्रेती बनली आहे आणि तिच्याकडे जास्वंदाची फुलं तर काही भाज्या, तर काही झाडांची पाने टेबलावर मांडलेली दिसत आहेत. दुसरी चिमुकली तिच्याकडे येऊन, स्वयंपाक बनवण्यासाठी या भाज्या खरेदी करते. त्यानंतर मग या तिघी पानांपासून स्वयंपाक बनवण्यास सुरुवात करतात. चिमुकलींनी मिळून कशाप्रकारे स्वयंपाक केला, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, खेळण्यातील विविध भांडी त्यांनी स्वयंपाकघरात मांडली आहेत. एक चिमुकली पानांना आकार देऊन त्याच्या पोळ्या बनवते आहे, तर बाकीच्या दोन चिमुकली भाजी, डाळ हा इतर स्वयंपाक बनवत आहेत. त्यानंतर या एकमेकींना खोटं-खोटं जेवायलासुद्धा वाढतात आणि जेवण कसं झालंय ते व्हिडीओच्या अगदी शेवटी सांगताना दिसतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या लहानपणीचे दिवस आठवले असतील एवढं नक्की.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mangesh.d9021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘लहानपणीची एक आठवण… भांडीकुंडी’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक मुलींना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या लहानपणीच्या दिवसांची आठवण आली आहे. ‘खरंच खूप भारी होते ते दिवस, परत यावेत’, ‘गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी’, ‘खोटा संसार करत करत कधी मोठे झालो आणि खरा संसार करायची वेळ आली कळलं नाही’, ‘हा व्हिडीओ पाहून बालपण माझ्या डोळ्यासमोर आलं’ आदी अनेक कमेंट तरुणींनी व्हिडीओखाली केल्या आहे