Viral Video : आपल्यातील प्रत्येकालाच व्यवसाय सुरू करण्याचा जोश आणि उत्साह असतो. पण, पहिला व्यवसाय हा लहानपणीच्या मित्र-मैत्रिणींबरोबरच सुरु करावा अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आपण अनेकदा या व्यवसायात कोण काय करणार हे सुद्धा ठरवतो. तर आज सोशल मीडियावर यांचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये काही लहान मुलं दिसत आहेत. या लहान मुलांनी खेळता-खेळता स्वतःचा दुकान सुरु केला आहे. नक्की कशाचं दुकान चिमुकल्यांनी सुरु केलं आहे हे आपण जाणून घेऊयात…
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) गावचा आहे. गावात चिमुकल्यांच्या एका ग्रुपने एक खास दुकान सुरु केलं आहे. हे दुकान सुरु करण्यासाठी प्रत्येक चिमुकल्याने चिप्सची पाकिटे तर काहींनी रिकामी बरण्या सुद्धा आणल्या आहेत. त्याचप्रमाणे पैसे ठेवण्यासाठी एक पेटी सुद्धा आणली आहे. दुकान बनवण्यासाठी त्यांनी हिरव्या व पांढऱ्या रंगाचा कापड वापरला आहे आणि दगड व काठ्यांच्या सहाय्याने हे छोटंसं दुकान उभारलं आहे. चिमुकल्यांनी उभारलेलं दुकान तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
बालपणीचे दिवस :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तीन मित्रांनी मिळून दुकान उघडलं आहे आणि आज दुकानाचे उदघाटन आहे. दुकानाच्या उद्घाटनासाठी काही गावातील चिमुकल्यांनी हजेरी लावली आहे असे व्हिडीओत दिसते आहे. हा सर्व खेळ सुरु असला तरीही या खेळातील भावना तुमच्यापर्यंत पोहचल्या असतील एवढं नक्की. हा खेळ सुरु असताना गावातील एका अज्ञात व्यक्तीने या खास क्षणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @raghuveer_singh_charpota या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘नवीन दुकानाचे उद्घाटन’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘हे येत्या काळातले बिझनेसमॅन असतील’, ‘कोणी कोणी असं लहानपणी केलंय?’, ‘व्हिडीओ पाहून लहानपणीची आठवण झाली’ आदी अनेक कमेंट तर अनेक जण चिमुकल्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.