Viral Video Shows Father and Daughter Bond : “तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासरला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यांमध्ये” हे गाणे ऐकले तरीही डोळ्यांत झटकन पाणी येतं. कारण- बापाचे लेकीवर आणि लेकीचे बाबांवर जीवापाड प्रेम असते. आई आणि मुलगी यांच्यातले प्रेम दिसते; मात्र आईएवढेच प्रेम करणारे बाबा मात्र त्यांचे प्रेम खूप कमी व्यक्त करतात. हे हळवं झालेलं वडिलांचं प्रेम लेकीच्या लग्नात अगदीच उफाळून बाहेर येतं. कारण- लाडात वाढलेली लेक त्यांना सोडून कायमची दुसऱ्याच्या घरी जाणार असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) लग्नातील आहे. नवरा-नवरीचं लग्न लागलेलं असतं, ते दोघ एकमेकांना वरमाला घालत असतात. सगळेच जण नवरा-नवरीवर फुलं टाकत असतात, तर कोणी फोटो काढत असतात तर अनेक जण त्या क्षणाचा आनंद घेत असतात. पण, या सगळ्यात व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीचं लक्ष नवरीच्या बाबांकडे जाते. लग्नात आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ते नकळत हात जोडतात. बाबांची लेकीवर असणारी माया व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म

हेही वाचा…आईसारखं दिसण्यासाठी चिमुकलीचा हट्ट, कुंकू लावण्यासाठी ढसाढसा रडली अन्… पाहा VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

कधीही न तुटणारे बंधन

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, नवरा-नवरी अगदी आनंदात असतात आणि एकमेकांना वरमाला घालताना दिसतात. हे पाहून बाबांचे मन भरून येते. आपण अगदी देवासमोर हात जोडतो. अगदी त्याचप्रमाणे बाबा स्टेजवर एका कोपऱ्यात उभे राहून डोळे बंद करून हात जोडतात. लेकीच्या आयुष्याची नवीन सुरुवात तर दुसरीकडे आपली लेक आपल्याला सोडून जाणार याचे आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात तरंगताना दिसतात. मग ते चष्मा काढून डोळे पुसण्यास सुरुवात करतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @randomlysameer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वडील आणि मुलगी, कधीही न तुटणारे बंधन, कधीही न संपणारे प्रेम’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तर, ‘जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये अचानकपणे वडिलांच्या रिॲक्शन कॅप्चर होते’; असा मजकूर व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. तुम्ही व्हिडीओखाली कमेंट पाहिल्यात, तर अनेक नेटकरी भावूक झाले आहेत आणि त्यांच्या भावना मांडताना दिसत आहेत हे लक्षात येते.

Story img Loader