Viral Video Shows Man Beating Up Pet Lion : वाघ आणि सिंह कधी कोणाची शिकार करतील हे कोणीच सांगू शकत नाही. सिंह पिंजऱ्यात बंदिस्त असला तरी तो सिंहच असतो हे कधीही विसरू नये. मात्र, काही जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि प्राण्यांची मस्करी करायला जातात, त्यांच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video) होत आहे. त्यामध्ये सिंहबरोबर मस्ती करणे एका माणसाला चांगलेच महागात पडले आहे. नक्की काय घडलं बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधला आहे. कन्टेन्ट क्रिएटर अझहर नेहमी सिंह, वाघ आणि सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर खेळत असतानाचे व्हिडीओ शेअर करीत असतो. तर आजसुद्धा त्याने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये पिंजऱ्यात तो, एक अज्ञात पुरुष आणि एक सिंह आहे. सिंहाने त्या माणसाचा पाय अगदीच घट्ट पकडून ठेवला आहे. तर कन्टेन्ट क्रिएटर अझहर काठीने सिंहाला मारत त्या अनोळखी माणसाची सुटका करण्याच्या प्रयत्न करत आहे. नक्की पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून ( Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, सिंह अनोळखी माणसाचे पाय पकडून घट्ट बसला आहे. नंतर तो चावण्याचादेखील प्रयत्न करताना दिसतो आहे. तर, अझहर काठीने प्राण्याला मारहाण करून, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अनोळखी माणूस वारंवार घाबरून ओरडतो आहे आणि “काट लिया इसने, काट लिया!” (हा मला चावला, मला चावत आहे) असे म्हणतो आहे. तसेच त्या माणसाला अजहर धीर देत आहे. असे करून सगळ्यात शेवटी तो त्या माणसाची सिंहापासून सुटका करण्यात यशस्वी होतो.

तुमच्याबरोबर असं कोणी वागलं तर ?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mian_azhar_lionking या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘वन्य प्राण्यांना मारणे हा गुन्हा आहे. कृपया त्यांचा आदर करा, त्यांना स्वातंत्र्य द्या. जर तुमच्याबरोबर असं कोणी वागलं, तर तुम्हाला कसे वाटेल?, पहिले तुम्ही त्याला पिंजऱ्यात टाकता, मग त्याला चिडवता. मग जेव्हा तो बदला घेतो, तेव्हा तुम्ही त्याच्यावर अत्याचार करता, हे तुमच्या कर्माचे फळ आहे आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत

Story img Loader