Viral Video Of Sweetest Couple : जोडीदार कसा असावा असे जर आपल्याला विचारले तर अपेक्षांची भली-मोठी यादी आपल्याकडे तयारच असते. तसेच काही जण पारखून-निरखूनच मग लग्नासाठी होकार देतात. पण, बऱ्याचदा त्याचे अनेक गुण लग्नानंतर समजतात. मग आपल्या अपेक्षांचा डोंगर कोसळतो. तर अनेक जण अगदी विरुद्ध विचार करतात. आपला जोडीदार आपण ज्या गोष्टी करतो त्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असावा एवढीच अपेक्षा असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, यामध्ये एक जोडपं अगदी आनंदात नाचताना दिसते आहे.
सध्या कोणताही कार्यक्रम असो डान्स करणे हा ट्रेंड सुरु झाला आहे. पण, अनेक जण गाण्यांवरून किंवा डान्स स्टेप्सवरून नवरा-नवरीच्या डान्सवर आक्षेप घेतात किंवा लग्न मोडून टाकतात. पण, जर अशा वेळी आपल्या जोडीदाराने साथ दिली तर अगदी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आणि कोण विरोध सुद्धा करत नाही. तर व्हायरल व्हिडीओनुसार अनेक नातेवाईक, मित्र-मैत्रिणी जमलेले दिसत आहेत. यासगळ्यात एक महिला आपल्या नवऱ्यासमोर डान्स करताना दिसत आहे. आपल्या बायकोला नाचताना पाहून नवऱ्याने काय प्रतिक्रिया दिली व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, बायको तिच्या नवऱ्यासमोर डान्स करताना दिसत आहेत. हे पाहून नवरा देखील न लाजता, कोणाचीही पर्वा न करता तिच्याबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतो आणि उपस्थितांमध्ये एकच जल्लोष दिसून येतो. दोघेही अगदी गाण्याच्या तालावर हावभाव देत, अगदी आनंदात आणि उत्साहात डान्स करताना दिसून आले आहेत, जे पाहून नेटकरी सुद्धा असा जोडीदार असावा किंवा अशी लव्ह लाईफ असावी अशी अपेक्षा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.
आणि आनंद मला होते आहे
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ _ashnn11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘शेवटी त्याने ज्या प्रकारे हावभाव केले त्या कृतीने खरंच माझे मन जिंकले’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. ‘तिच्या मेहेंदीचा रंग सर्व काही सांगून जातोय, तो त्याच्या बायकोचे कौतुक करत आहे आणि आनंद मला होते आहे, तो तिच्याकडे जितक्या प्रेमाने बघतोय तेच पाहून मन भरून आले’ ; आदी अनेक कमेंट नेटकर्यांनी केल्या आहेत.