Cycle Stunt Viral Video: सोशल मीडियावर स्टंटबाजी करून रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणतीही जोखीम पत्करायला मागे-पुढे पाहत नाहीत. प्रोफेशनल ट्रेनरच्या सहवासात स्टंट केले, तर भीती नसते. पण, कोणत्याही सुरक्षेशिवाय स्टंट करण्याने स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक व्यक्ती स्टंट करताना दिसत आहे. ते पाहून एकीकडे युजर्स घाबरले आहेत; तर दुसरीकडे ते या स्टंटला मूर्खपणा म्हणताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओची सुरुवात तरुणाच्या सायकल चालवल्याने होत आहे. पण, ही सायकल तो संरक्षक भिंतीवरून चालवताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला लहान मुलगा तरुणाला ‘असं करू नकोस’ असं म्हणताना दिसत आहे. पण, सायकल चालविणारा तरुण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि संरक्षक भिंतीवरून वेगाने सायकल चालविण्यास सुरुवात करतो. या संरक्षक भिंतीवरून तरुणाचा तोल गेला असता, तर मोठी दुर्घटनेची शक्यता होती. पण, तसं काहीच काहीच झालं नाही. तरुणाचा हा अजब स्टंट व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘ससा-कासव’ स्पर्धा पुन्हा रंगली; चिमुकल्यांनी मैदान केलं तयार अन्… VIRAL VIDEO तून पाहा शर्यत कोण जिंकलं

व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

https://www.instagram.com/p/C8GmxeDPCvQ/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=5184924d-637e-4c11-bf66-d5a62ef858ea

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सायकल चालवणारा तरुण संरक्षकण भिंतीच्या कड्यावरून सायकल चालवून झाल्यानंतर पायऱ्यांवर सायकल चालवण्यास सुरुवात करतो. नंतर जसजसा व्हिडीओ पुढे जातो तसतसा तो थेट एका गावात शिरतो. तेथे अगदी छोटासा रस्ता असतो आणि तरीही त्यातून तो हुशारीने मार्ग काढत सुखरूपपणे खाली उतरतो. पण, व्हिडीओ पाहता हे लक्षात येतं आहे की, तरुणाच्या शरीराला अनेक वेदनांना सामोरे जावं लागलं असेल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tisyawarali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ पाहून खूप भीती वाटली आहे, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय की, भाऊ, तुम्ही सायकल चालवत आहात; पण मला भीती वाटते आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हाडे तुटतील तुझी. तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, व्हिडीओ बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. पोस्ट केल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओला ५६ लाखांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.