Video Shows Man Help His Blind Partner To Win Game : लग्न म्हणजे एक-दोन दिवस नव्हे, तर एखाद्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचे असते. जर तुमच्या दोघांच्या जीवनशैलीत किंवा स्टॅण्डर्डमध्ये खूप फरक असेल, तर अनेकदा वाद-विवाद होतात. पण, जर समजून घेणारी व्यक्ती असेल, तर कोणत्याही परिस्थितीत अगदी छोटासा क्षणही खास होऊन जातो. आज असाच एखादा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला खास खेळ जिंकण्यास मदत केली आहे.
व्हायरल व्हिडीओ जत्रेचा आहे. जत्रेमध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये आकाशपाळणा, जादूचे खेळ, विविध झिकझॅक गोष्टी आदी खेळांचा समावेश असतो. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक जोडपे जत्रेत खेळ खेळत असते. पण, जोडीदार आंधळी असल्यामुळे खेळ खेळू शकली नसती. मग जोडीदार पुढे नेमके काय करतो? खेळ जिंकण्यास तिला मदत करतो का? हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा …
हा आनंद : जगात कुठेही दिसणार नाही (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, जोडपे जत्रेत खेळ खेळत असते. त्यातील स्त्री आंधळी असते. तिचा जोडीदार तिच्या हातात बॉल देतो आणि तिचा हात पकडून बॉल योग्य त्या रकान्यात टाकतो आणि दोघेही हा खेळ जिंकतात आणि त्याच्या बदलत्यात त्यांना छोटासा डबा भेट म्हणून दिला जातो. भेटवस्तूला स्पर्श करताच तिच्या चेहऱ्यावर नकळत आनंद येतो आणि इथेच व्हिडीओचा गोड शेवट होतो.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @do_lafz_783 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला फक्त योग्य व्यक्ती सोबत असण्याची गरज आहे…’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “ती स्त्री कशीही असो. फक्त आधार देणारी आणि निष्ठावंत हवी”, “त्यांना पाहून मला आनंद का होतो आहे”, “प्रेम आंधळं असतं भाऊ, आज ते मी प्रत्यक्षात पाहिलं”, “हा आनंद : जगात कुठेही दिसणार नाही” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.