Video Shows Man Fed Water To The Duckling : आपण संकटात असल्यावर आपल्याला कोणी मदत केली नाही म्हणून आपण इतरांनाही मदत करू नये ही अगदीच स्वार्थीपणाची भावना आहे, कारण दुसऱ्याला मदत करणे हे पुण्यकर्म मानले जाते. इतरांना मदत करणे हे आदर्श व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असते. समोरच्या व्यक्तीला केलेली छोटीशी मदत आपले जीवन बदलते, एक सकारात्मक भावना आपल्यात जागी होते आणि दिवसभर आपण एखाद्याला मदत केली याबद्दल सुखसुद्धा मनात राहते. तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे.

माणसांप्रमाणेच प्राण्यांनासुद्धा अन्न, पाणी, निवारा यांची गरज असते; तर आज व्हायरल व्हिडीओत काही बदकाची पिल्ले चालत येत असतात. त्यांना पिण्यासाठी पाणी हवे असते हे एका अज्ञात व्यक्तीला समजते. तर रस्त्याकडेला एक नळ असतो. बदकाच्या पिल्लांना तो इशाऱ्यामध्ये रस्त्याकडेला यायला लावतो. त्यानंतर नळातून येणारे पाणी त्याला सगळ्या पिल्लांना प्यायला द्यायचे असते. यासाठी तो नेमका काय जुगाड करतो, व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, व्यक्ती बदकाच्या पिल्लांना पाणी पाजण्यासाठी नळाखाली हात धरतो. त्याच्या हाताच्या साहाय्याने ते पाणी नकळत काही बदकाच्या पिल्लांपर्यंत पोहचते. काही बदकाची पिल्ले अंगावर पाणी पडतंय म्हणून खेळू लागतात, तर काही जमिनीवर पडलेल्या पाण्याचा आनंद घेताना दिसतात. अशाप्रकारे अज्ञात व्यक्तीने पाणी देऊन बदकाच्या पिल्लांची तहान भागवली आहे, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल एवढे तर नक्कीच…

किती छोट्या छोट्या गोष्टींनी मन आनंदी होते…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आजच्या दिवसातला सगळ्यात खास व्हिडीओ’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून अज्ञात व्यक्तीचे कौतुक करत आहेत. ‘जग कितीही वाईट असले तरी तुम्ही चांगले रहा’, ‘किती छोट्या छोट्या गोष्टींनी मन आनंदी होते आणि चेहऱ्यावर हसू येते’, ‘मनाने श्रीमंत’, आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader