Viral Video Shows Man Feeds Stray Dog : माणसांमध्ये प्राण्यांबद्दलचे कुतूहल आणि पशुप्रेम दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘एक वेळ प्राण्यांवर प्रेम करू; पण माणसांवर नाही’ अशी वाक्यं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. कारण- माणसासाठी केलेली गोष्ट माणूस विसरेल; पण प्राणी कधीच विसरणार नाहीत. तुम्ही पाळीव किंवा भटक्या प्राण्यांना मान-सन्मान दिला, खाऊ-पिऊ घातले की, आपसूकच ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे भोळीभाबडी माणसेसुद्धा अशा मुक्या प्राण्यांच्या प्रेमात पडतात. आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

व्हायरल व्हिडीओत दोन माणसं (मित्र) रेल्वेस्थानकावर गप्पा मारत असतात. यादरम्यान त्यांच्या बाजूला एक श्वान येऊन उभा राहतो. श्वानाला भूक लागली आहे, असे त्यातील एका माणसाला कळते. दोघांपैकी एक माणूस पावाचे तुकडे श्वानाला भरवण्यास सुरुवात करतो. काही तुकडे भरवल्यानंतर पाव संपतो आणि मग तो श्वानाला, “बस झालं की आणखीन एक हवा आहे”, असे विचारताना दिसतो. श्वान त्यावर कशी प्रतिक्रिया देतो आणि माणूस त्याच्यासाठी आणखीन एक पाव घेतो का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, अंगावर धावून न जाता किंवा खायला दे, असा कोणताही हट्ट न करता श्वान दोन माणसांच्या जवळ जाऊन उभा राहतो. तसेच आणखीन एक पाव हवा का, असे माणसाने विचारताच श्वान मान खाली घालून शेपटी हलवतो. त्यानंतर माणूस दुकानदाराकडून आणखीन एक पाव घेतो आणि व्हिडीओचा शेवट होतो. तसेच जमिनीवर अन्न ठेवण्याऐवजी तो माणूस स्वतःच्या हाताने श्वानाला खाऊ घालतो आहे हे पाहून त्यांचे कौतुक करण्यापासून तुम्हीही स्वतःला थांबवू शकणार नाही.

जगाच्या कानाकोपऱ्यात चांगल्या मनाची माणसे सुद्धा आहेत…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr.dogcode__kalyan_2 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कर्म’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरीसुद्धा “मला मान्य आहे की जगात खूप वाईट लोक आहेत; पण जगाच्या कानाकोपऱ्यात काही चांगल्या मनाची माणसेसुद्धा आहेत”, “काका जमिनीवर अन्न ठेवण्याऐवजी स्वतःच्या हातांनी खाऊ घालत आहेत, ते पाहून खूप छान वाटले”, हे पाहून त्यांच्या घराजवळील प्राणी चांगले जीवन जगत असतील, असा अंदाज लावू शकतो आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.