Viral Video Shows Man Go For Fishing : आपल्यातील अनेकांना मासे पकडायला खूप आवडतात. ग्रामीण भागात नदी, ओढा, तलाव आदी ठिकाणी अनेकजण मासेमारी करतात. पण, मासे पकडणं सगळ्यात अवघड काम आहे.कित्येक तास एकाचं ठिकाणी थांबल्यानंतर एखादा मासा सापडतो आणि मग आपला आनंद गगनात मावत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये मासे पकडणारी व्यक्तीला माशाने पकडलं आहे. नक्की काय घडलं बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेलेली दिसते आहे. नदीवर एक ब्रिज बांधला आहे. या ब्रिजवर उभी राहून ही व्यक्ती मासे पकडत असते. पण, यादरम्यान एक ट्विस्ट येतो आणि बहुधा मासे पकडताना तिचा तोल जातो किंवा नक्की काय घडतं माहिती नाही. पण, ही व्यक्त्ती मासे पकडताना पडते आणि ब्रिजला लटकलेली दिसते. नेमकं काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा…

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘प्रिय बाबा… ‘ वाढदिवसासाठी लेकीने बनवलं हँडमेड गिफ्ट; क्रिएटिव्हिटी पाहून वाजवाल टाळ्या

व्हिडीओ नक्की बघा…

शिकारीच झाला शिकार?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मासे पकडायला गेलेली व्यक्ती स्वतःच माश्याची शिकार झाली आहे. ब्रिजवर मासे पकडायला उभी असलेली व्यक्ती तोल जाऊन खाली पडते आणि ब्रिजला लटकते. यादरम्यान एक मोठा मासा व्यक्तीच्या शर्टाचे टोक पकडून उभा असतो. व्यक्तीला काय करावे हे सजमत नसते, आपली या प्रसंगातून सुटका कशी करावी हे त्यालाही कळतं नसते. यादरम्यान तिथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा प्रसंग त्याच्या मोबाईलमध्ये कैद करून घेतला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nurseloveofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भाऊ मासेमारीसाठी गेला होता की मासा भाऊला पकडायला आला होता, या दोघांपैकी एक जण नक्कीच यशस्वी होईल’ अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून हसत आहेत आणि संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एकूणच थक्क करणाऱ्या या मजेशीर व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Story img Loader