Viral Video Shows Man Light A Small Rocket Using Alexa : दिवाळी सर्वत्र अगदी धुमधडाक्यात साजरी होताना दिसते आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस असून सगळीकडे लक्ष्मीपूजन केले जाईल. दिवाळी म्हटलं की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फटाके फोडायला भरपूर आवडतात. प्रत्येक जण दरवर्षी फटाके फोडताना काहीतरी नवनवीन प्रयोग करून पाहत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रॉकेट पेटवण्यासाठी कोणत्या माणसाची नाही तर तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) टेरेसचा आहे. रात्रीची वेळ आहे आणि रॉकेट उडवण्याची तयारी सुरू आहे. स्टीलच्या बाटलीवर रॉकेट लावण्यात आलं आहे आणि त्याला काही वायर जोडण्यात आल्या आहेत. पण, हे रॉकेट उडवण्यासाठी लायटर किंवा माचीसचा नाही तर अलेक्साचा (Alexa) उपयोग करण्यात आला आहे. पण, अलेक्सा आपण दिलेल्या कमांडसह प्रत्येक गोष्टी करतो खरं, पण तो एखादा फटाका कसा फोडू शकतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर चला, याचं उत्तर व्हायरल व्हिडीओतून पाहूया…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘तो दिवस आज आला…’ दिवाळीनिमित्त आईला दिली अनोखी भेट, रिॲक्शन पाहून लेकाच्या डोळ्यात आलं पाणी

व्हिडीओ नक्की बघा…

होय बॉस, रॉकेट लाँच करत आहे…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, एक अज्ञात व्यक्ती अलेक्साला कमांड देते की, “अलेक्सा रॉकेट लाँच कर”, त्यावर अलेक्सा म्हणते की, “होय बॉस, रॉकेट लाँच करत आहे,” असं म्हटल्यानंतर स्टीलच्या बाटलीतून फटाका हवेत उडताना दिसत आहे. अलेक्साला रॉकेट लाँचरमध्ये रूपांतरित करण्यासाठी कसं तयार करण्यात आलं याचा बीटीएस (BTS) व्हिडीओसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता की, अलेक्साला कमांड दिल्यानंतर उपकरण उष्णता निर्माण करते, जी विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने ज्वालामध्ये बदलू शकते आणि मग रॉकेट हवेत उडू शकते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @manisprojectslab या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “अ‍ॅलेक्सासह रॉकेट लाँच करत आहे” ; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत आणि अनेक मजेशीर कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत. इतरांबरोबरच, Amazon Alexa India ने देखील या पोस्टवर कमेंट केली, “‘हँड्सफ्री दिवाळी” स्विगी इंस्टामार्ट देखील म्हणतोय की, “एआय खूप पुढे गेले आहे” ; आदी अनेक कमेंट करण्यात आल्या आहेत.