Video Shows Man Convert Car Into Shop : अनेक व्यापारी ग्राहक आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. मग ती ऑफर असो, डिस्काउंट असो किंवा मग दुकान सुंदररीत्या सजवणे असो. जेणेकरून ग्राहकांना आवडीच्या वस्तू खरेदी करता येतील आणि आकर्षक ठिकाण असेल, तर फोटो काढून सोशल मीडियावर पोस्टही करता येतील. याच कारणानं त्यांच्या दुकानाचे प्रमोशनसुद्धा होईल; अशी बहुधा प्रत्येक व्यापाऱ्याची युक्तीसुद्धा असेल. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ एका दुकानमालकाचा आहे. त्याने चालते-फिरते दुकान बनवले आहे. मारुती ८०० (maruti 800) या गाडीचे त्याने चक्क दुकानात रूपांतर केले आहे. म्हणजेच गाडीचे सनरूफ असते त्या ठिकाणी त्याने एक बॉक्स बसवून घेतला आहे. त्याचे दुकानात रूपांतर करून काही वस्तू लटकवून ठेवल्या आहेत. एवढेच नाही तर दुकानात बसण्यासाठी त्याने चक्क गाडीच्या मागच्या सीटचा अनोखा वापर केला आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तसेच तुम्ही या व्यापाऱ्याच्या कल्पनेचं कौतुक कराल एवढे तर नक्की.

हे बघून माझं डोकं काम नाही करत आहे (Viral Video)

अनेकदा गाडी जुनी झाली, तर आपण ती विकून टाकतो. पण, या माणसाने भलताच जुगाड केला आहे आणि आपल्या गाडीचेच दुकानात रूपांतर केले आहे. तर हेच दृश्य रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका अनोळखी प्रवाशाने पाहिले आणि त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, या छोट्याच्या दुकानात त्याला बसायला किंवा ग्राहकांच्या गरजेचे सामान ठेवायला कोणतीच अडचण येत नाही. एवढेच नाही, तर नक्की या माणसाला हा जुगाड सुचला तरी कसा, असा प्रश्न कमेंटमध्ये अनेकांना पडलेला दिसतो आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jabalpur_nazare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कोणी आधी असा विचार केला होता का’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “भावा, काय विचार आहे तुझा”, “अरे, आजच आम्ही या अनोख्या दुकानाबद्दल घरी चर्चा करीत होतो आणि आजच हे दुकान व्हिडीओत दिसलं”, “हे बघून माझं डोकं काम नाही करत आहे”, “चालतं-फिरतं दुकान” आदी कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत