Video Shows Man play Flute On the airport : आपल्यातील अनेकांना विविध वाद्ये वाजायला प्रचंड आवडतात. त्यामध्ये प्रामुख्याने गिटार, बासरी यांचा समावेश असतो. बासरीतून निघालेला स्वर हा प्रेमाचा स्वर असतो. त्यामुळे कुठेही बासरीचे स्वर ऐकू आले तरी आपण अगदी थक्क होऊन जातो आणि तो आवाज अगदी मंत्रमुग्ध होऊन फक्त ऐकत राहतो. तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे घडले आहे. त्यामध्ये एअरपोर्टवर एक तरुण बासरी वाजवताना दिसला आणि सगळे थक्क होऊन हा आवाज ऐकत बसल्याचे दिसते.

व्हायरल व्हिडीओ जयपूरचा आहे. @jaipuri_brothers अनेक कार्यक्रमात त्यांच्या गाण्यांची, वाद्यांची जादू दाखवतात. तर @jaipuri_brothers जयपूर विमानतळावर पोहोचले. तेथील तपास अधिकाऱ्याने जेव्हा ओळखपत्र मागितले आणि त्यांच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा त्यात असंख्य बासरी दिसल्या. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी त्याला बासरी वाजवण्याची विनंती केली. तर तपास अधिकाऱ्यांसाठी तरुण नेमके कोणते गाणे बासरीवर वाजवतो? ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, विमानतळ कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार तरुण बासरी हातात घेऊन ‘तेरी मिट्टी में मिल जावाँ…’ हे गाणे वाजवण्यास सुरुवात करतो. विमानतळावर उपस्थित अनेक अधिकारी, प्रवासी त्याचे हे गाणे ऐकण्यासाठी काही क्षण थांबतात, तर काही जण त्या प्रसंगाचा व्हिडीओसुद्धा काढतात आणि बघता बघता विमानतळाचे मैफिलीमध्ये रूपांतर होते. बासरीवर गाणे वाजवून झाल्यानंतर उपस्थित सगळेच टाळ्या वाजवून कौतुक करण्यास सुरुवात करतात.

व्हिडीओ नक्की बघा…

त्याने बासरी वाजवताच गाण्याच्या प्रत्येक ओळी तुम्हीही गुणगुणाल एवढे तर नक्की. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @appkalakaars या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘रायपूर विमानतळावर, विमानतळ कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार आमचा एक छोटासा कार्यक्रम आहे! संगीतप्रेमी एअरलाइन कर्मचाऱ्यांसोबत मजा’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा त्या बासरीवादक तरुणाचे कौतुक करीत “जर एखादा माणूस बासरी इतकी चांगली वाजवू शकतो, तर कृष्ण कशी बासरी वाजवत असेल याची कल्पना करा”, “भावाचे स्वप्न पूर्ण झाले. विमानतळावर हजारो लोकांसमोर आपले वाद्य वाजवून दाखवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.