Video Shows Man Purchase His First Dream Bike : पहिली कार आणि पहिली बाईक विकत घेणे ही प्रत्येक व्यक्तीसाठी अपूर्वाई असते. त्यामुळेच लोक आपल्या पहिल्या बाईकची खूप काळजीपूर्वक देखभाल करतात आणि ती खूप प्रेमाने चालवतात. पहिल्या बाईकवर लकी नंबर लिहिलेली नंबर प्लेट बनवून घेणे, नवीन हेल्मेट घेणे, बाईक अगदी सुरक्षित जागी पार्क करणे आदी अनेक गोष्टी पहिल्यांदा बाईक घेतलेली व्यक्ती करतेच. कारण- एकेक पैसे जोडून, दिवसरात्र मेहनत करून, अनेक वर्षं वाट पाहून ही बाईक घेण्याचे स्वप्न त्या व्यक्तीने पूर्ण केलेले असते. तर आज सोशल मीडियावर हेच दृश्य दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हीरो मोटोकॉर्प कंपनीची ‘हीरो स्प्लेंडर’ (Hero’s Splendor) ही सर्वांत लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. या बाईकची अनेक मॉडेल्स बाजारात आहेत. त्यामुळे ग्राहकसुद्धा अशी बाईक घेण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. तर, आज व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती हीरोची हीच ‘स्प्लेंडर बाईक’ खरेदी करायला गेला आहे. त्याच्या एका हातात पैशांचे बंडल दिसते आहे आणि दुसऱ्या हाताने तो फॉर्म भरताना दिसतो आहे. त्याच्याबरोबर त्याचा एक मित्रदेखील उपस्थित आहे. पहिल्यांदा बाईक घेणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

काही कॉलेजचे विद्यार्थी आपल्या आई-बाबांकडे बाईक घेण्यासाठी हट्ट करतात. ही मुले नोकरीसुद्धा करीत नाहीत. पण, फक्त सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी आणि इतरांना दिमाख दाखविण्यासाठी कमी वयात बाईक खरेदी करतात. पण, आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत बाईक घेणाऱ्या त्या व्यक्तीच्या डोळ्यांत त्याची मेहनत आणि पहिली बाईक स्वखर्चाने घेण्याची चमक अगदी स्पष्टपणे दिसते आहे. म्हणून शो-रूममध्ये उपस्थित असलेल्या @sola__laso या तरुणीने त्या तरुणाची धमक दर्शविणारा हा व्हिडीओ शूट करून घेतला आणि ‘मेहनतीच्या कमाईची स्प्लेंडर’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

त्याचा खूप अभिमान वाटतो आहे (Viral Video)

हीरो मोटोकॉर्प कंपनीने हा व्हायरल व्हिडीओ पाहिला आणि सोशल मीडियावर @hero_bikers_india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. ‘त्याचे डोळे त्याच्या मेहनतीबद्दल सर्व काही सांगत आहेत’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा भावूक झाले आहेत. काही जणांनी, “मी त्याला ओळखत नाही; पण त्याचा खूप अभिमान वाटतो आहे”, “भावा, कष्टाने कमावलेल्या पैशातून फक्त स्प्लेंडर बाईकच खरेदी करता येते” आदी कमेंट्स केल्या आहेत; तर काही जण त्याचे अभिनंदन करताना दिसून आले आहेत.