Viral Video Shows Man Sign Birthday Song : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. हा दिवस मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य आणखीन खास करतात. पण, वाढदिवसाला एखाद्याला काय गिफ्ट द्यायचं, हा प्रश्न आपल्यातील अनेकांच्या मनात असतो. त्यातच जर एखाद्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं असेल, तर आपण ड्रेस, मेकअपचे सामान तर मित्राला टीशर्ट, शर्ट किंवा पाकीट असे काहीतरी देण्याचा विचार करतो. पण, जर तुमच्यासाठी कोणीतरी गाणं बनवलं, तर तुम्हाला आवडेल का? हो… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने वाढदिवसासाठी खास मराठी गाणं बनवलं आहे.
ब्रिटानिया ही बिस्किटं तयार करणारी कंपनी देशातल्या काही जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची बिस्किटंच नाही, तर केक, ब्रेड व इतरही अनेक उत्पादनं खूप प्रसिद्ध आहेत. या सगळ्यात कंपनीचे आपल्यातील अनेकांना आवडते ते बिस्कीट म्हणजे गुड डे बिस्कीट. तर आज याच बिस्कीट पुड्याच्या नावाला जोडून एका अज्ञात व्यक्तीनं गाणं बनवलं आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. पण, अज्ञात व्यक्तीनं वाढदिवसासाठी तयार केलेलं हे मराठी गाणं एकदा नक्की ऐका.
हेही वाचा…‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
व्हिडीओ नक्की बघा…
तुझा आहे बर्थडे, तुला देतो गुड डे
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अज्ञात व्यक्ती एका दुकानात बसली आहे. तसेच हातात केशरी रंगाचा गुड डे बिस्कीट घेऊन गाणं म्हणते आहे. या वाढदिवस स्पेशल मराठी गाण्याचे बोल आहेत ‘तुझा आहे बर्थडे, तुला देतो गुड डे’. हे गाणं म्हणत तो बिस्किटाचा पुडा पुढे-मागे करतो आणि अगदी मजेशीर हावभावसुद्धा देतो. जे पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल. हा व्हिडीओ त्या व्यक्तीने स्वतःच फ्रंट कॅमेऱ्याने शूट करून घेतला आहे, जो तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल एवढं नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @funnyporya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, ‘याला २१ तोफांची सलामी द्या’, तर दुसरा म्हणतोय की, ‘तुला देतो फटके, तुझा आहे बर्थडे’ तर तिसरा म्हणतोय की, ‘मला नको गुड डे, माझा नाही बर्थडे’ आदी अनेक कमेंट्स तर अनेक जण मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कमेंट्समध्ये टॅग करताना दिसत आहेत.