Viral Video : २६ जानेवारी, १५ ऑगस्टला भारत देशाचा तिरंगा फडकवताना आपण अभिमानाने राष्ट्रगीत म्हणतो. अनेकदा आपण रस्त्यावरून जात असतो तेव्हा शाळा, कॉलेजमध्ये राष्ट्रगीत सुरू असते, तर कधी चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत पडद्यावर सादर केले जाते. यावेळी आपल्यातील बरेच जण राष्ट्रगीताचा मान ठेवून स्तब्ध उभे राहतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये रंगकाम करणारी एक व्यक्ती राष्ट्रगीत सुरू असताना काम थांबवून स्तब्ध उभी राहिली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कॉलेज किंवा शाळेतील आहे, असे व्हिडीओच्या कॅप्शनमधून समजते. एक व्यक्ती रंगकाम करताना दिसते आहे. रंगकाम करत असताना अचानक राष्ट्रगीत सुरू होते. त्यादरम्यान व्यक्तीने भिंतीला रंग लावण्यासाठी ब्रश बादलीत बुडवलेला असतो. तितक्यात राष्ट्रगीत सुरू झाल्यामुळे तो ज्या स्थितीत असतो तसाच स्तब्ध उभा राहतो. हे पाहून काही जण हसण्यास सुरुवात करतात आणि या गोष्टीचा व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट करून घेतात. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : लायसन्स कुठे आहे? आजोबा-नातीला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, दंड मागताच पाहा चिमुकलीने काय केलं

व्हिडीओ नक्की बघा…

विद्यार्थी ‘त्याच्या’वर हसत होते…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, रंगकाम करणारी व्यक्ती राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभी राहते. पण, रंगकाम करताना व्यक्ती ज्या जागेवर, ज्या पोझिशनमध्ये उभी असते ते पाहून तेथे उपस्थित काही विद्यार्थी हसू लागतात, तर हे पाहून कमेंटमध्ये अनेक नेटकऱ्यांनी कामगाराची बाजू घेत हसणाऱ्यांना खडेबोल ऐकवले आहेत. राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहावे की नाही हे आपल्या वैयक्तिक मतावर अवलंबून आहे. पण, जर एखादी व्यक्ती राष्ट्रगीताचा मान ठेवत असेल, तर आपण सर्वांनी त्या गोष्टीचा आदर ठेवला पाहिजे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @cyberdddd या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘या माणसाबद्दल आदर. इतर लोक फिरत असताना तो राष्ट्रगीतासाठी उभा राहिला’, असा मजकूर व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे; तर ‘विद्यार्थी ‘त्याच्या’वर हसत होते, पण त्यांनी स्वतःवरच हसलं पाहिजे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कामगाराचे भरपूर कौतुक व आदर करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत आणि सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.