मेट्रोमध्ये तुम्ही लोकांना सीटसाठी भांडताना किंवा एखादा व्हिडीओ बनवताना अनेकदा पाहिल असेल. परंतु काय होईल जेव्हा एखादी व्यक्ती आपले कपडे काढून मेट्रोमध्येच आंघोळ करायला लागेल. होय, आजकाल अशाच एका विचित्र व्हिडीओने नेटिझन्सचे मन चकित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: मेट्रोमध्ये असे कृत्य पाहून थक्क होणे साहजिकच आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या आत बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या या कृत्याचा लोकांना त्रास झाला, त्यानंतर या व्यक्तीने जे काही केले ते आणखी आश्चर्यकारक करणारे आहे.
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर विचार करत असाल की हे सर्व चाललंय काय. तसे, कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडीओ भारतातील नाही, तर हे विचित्र दृश्य न्यूयॉर्क शहरातील मेट्रोचे आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमधील प्रवाशांमध्ये एक व्यक्ती आनंदाने बाथटबमध्ये आंघोळ करत आहे. दरम्यान, इतर प्रवाशांच्या अंगावरही पाणी पडू लागते. यामुळे काही लोक वैतागून या व्यक्तीला थांबवू लागतात. पण या माणसाने आपली मनमानी सुरू ठेवल्याचे आपण पाहू शकता. तो कोणाचेच ऐकत नाही. यानंतर हा संवाद हाणामारी आणि मारामारीपर्यंत पोहोचतो.
( हे ही वाचा: नोएडाचा ट्विन टॉवर कोसळताच ट्विटरवर झाला मीम्सचा वर्षाव; वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही)
तो माणूस मेट्रोमध्ये आंघोळ करतानाच व्हिडीओ पाहा
( हे ही वाचा: IND vs PAK: हार्दिक पंड्याचा विजयी षटकार अन् अफगाणी चाहत्याने केलेला तो Kiss; पाहा VIRAL VIDEO)
हा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला अनेक व्ह्यूज आले आहेत. तसेच अनेक जण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.