Viral Video Show Man Throws Stone At Moving Train : रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा तुम्हाला विचित्र अनुभव आले असतील. काही जण ट्रेनमध्ये किरकोळ कारणासाठी मुद्दाम साखळी (अलार्म चेन) ओढतात, प्रवाशांशी सीटवरून भांडतात, तर ट्रेनमध्ये चढताना काही नागरिक पाकीट, सोन्याची चेन किंवा फोन चोरण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. अनेक जण मुद्दाम धक्काबुक्की करीत इतर प्रवाशांना त्रासही देतात. पण, आज तर एका नागरिकाने हद्दच पार केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरुण एक्स्प्रेसवर दगडफेक करताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ भागलपूर जयनगर इंटरसिटी एक्स्प्रेसचा आहे. एक्स्प्रेस वेगाने दरभंगा ते काकर घाटीदरम्यान जात होती. तेव्हा रेल्वे रुळांजवळ एक तरुण बसला होता. एक्स्प्रेस वेगात जात असताना तरुणाने अंदाधुंद दगडफेक केली. पण, त्या दगडफेकीमुळे ट्रेनमधील एक प्रवासी जखमी झाला आहे आणि हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. याबाबत तत्काळ कारवाई करीत दगडफेक करणाऱ्याला अटक करण्यात आली. नक्की काय घडलं, दगडफेक करणारा तरुण कोण हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?

हेही वाचा…बैलगाडीतून मिरवणूक, डान्स अन्… विद्यार्थ्यांनी असा साजरा केला शिक्षकाचा निरोप समारंभ; गुरू-शिष्याचं प्रेम दाखवणारा ‘हा’ VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

धावत्या एक्स्प्रेसवर दगडफेक :

व्हायरल पोस्टमध्ये दोन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भागलपूर जयनगर इंटरसिटी एक्स्प्रेसवर बिहारचा एक तरुण दगड मारताना दिसला आहे. त्या दगडाच्या आघातामुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा नाकातून रक्तस्राव होताना दिसत आहेत. या दोघांचेही फोटो या पोस्टमध्ये शेअर करण्यात आले आहेत. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @RailMinIndia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या घटनेची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, दगड फेकणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे आणि त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हासुद्धा नोंदविण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक सोशल मीडिया युजर्सनीही तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका युजरने लिहिले, ”लवकरात लवकर त्याला अटक करा आणि कठोर शिक्षा द्या.” दुसऱ्याने कमेंट केली, ”सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासन आणि आरपीएफबरोबरच नागरिकांनाही समाजकंटकांबाबत सतर्क राहावे लागेल” आदी स्वरूपाच्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader