Viral Video: उन्हाळा म्हणजे सूर्यप्रकाश, घाम व आर्द्रता यांचा हंगाम. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हामुळे कुठेही बाहेर जावेसे वाटत नाही. सतत काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते आणि पंखा, एसी किंवा कूलरसमोर शांतपणे बसून राहावेसे वाटते. तर समाजमाध्यमांवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका व्यक्तीनं उष्ण वातावरणापासून बचाव करण्यासाठी हटके उपाय शोधून काढला आहे; जो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.
व्यक्ती कूलिंग सेटअपसमोर अगदी शांतपणे झोपलेली दिसत आहे. तसेच थंडगार हवेसाठी एका कूलरला खुल्या फ्रिजसमोर उभा केला आहे. व्यक्तीनं फ्रिजची मदत घेऊन, थंडगार हवेसाठी जुगाड केला आहे. त्याच्या या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचं कौतुक होण्याऐवजी, त्या व्यक्तीला नेटकऱ्यांच्या टीकांना तोंड द्यावं लागत आहे. या व्यक्तीनं नक्की काय जुगाड केला आहे चला पाहू.
व्हिडीओ नक्की बघा…
तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्तीनं थंडगार कूलरसाठी अनोखा जुगाड केला आहे. आपण अनेकदा कूलरमध्ये बर्फ किंवा बर्फाचं पाणी टाकतो; जेणेकरून थंडगार हवा मिळेल. पण, या व्यक्तीनं असं करण्याऐवजी देशी जुगाड केला. त्यामध्ये त्यानं खुल्या फ्रिजसमोर कूलर ठेवून स्वस्तात मस्त एसी बनवला आहे. या पठ्ठ्याची ही ‘कामगिरी’ तुम्हीही डोक्याला हात लावला असेल ना?
समाजमाध्यमांवर हा व्हायरल व्हिडीओ @WokePandemic या एक्स ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्याच्या क्लृप्तीला देसी जुगाड तर म्हणतच आहेत. पण, काही जण त्यामुळे वीजबिलसुद्धा भरभक्कम येईल, असंसुद्धा म्हणताना दिसत आहेत. एकूणच या अजब जुगाडानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.