Video Shows Medical Student Fixing Slipper With Surgical Needle and Thread : डॉक्टर, नर्स बनणे वाटते तितके सोपे नसते. कोरोना काळात या डॉक्टर आणि नर्सची कामगिरी तर खूपच मोलाची होती. रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णांचा स्वभाव, त्यांचा आजार समजून, त्यांच्याशी आईप्रमाणे विचारपूस करून, काय हवं नको ते अगदी मिनिटामिनिटाला तपासावे लागते. सकाळी, रात्री, दुपारी, रात्री अशा या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करता करता डॉक्टर आणि नर्स त्यांच्या खऱ्या आयुष्यात संकटाना कसे सामोरे जात असतील असाही प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याचा एक अनोखा क्षण व्हिडीओत कॅप्चर केला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांची ऑन ड्युटी दरम्यान चप्पल तुटते. तर त्याला बाजूलाच शस्त्रक्रियेची साधने दिसतात. मग कोणताही विचार न करता तापलेली तुटलेली चप्पल दुरुस्त करण्यासाठी तो शस्त्रक्रियेच्या साधनांचा वापर करतो. अगदी चप्पल-बूट शिवणाऱ्या व्यक्तीप्रमाणे हा वैद्यकीय विद्यार्थी आपली चप्पल शिवतो आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

तो कदाचित सराव करतो आहे (Viral Video)

अनेकदा ऑफिसला किंवा फिरायला जाताना नकळत आपली चप्पल तुटते. मग अशावेळी चप्पल-बूट शिवणारी व्यक्ती मिळेपर्यंत आपण काहीतरी जुगाड शोधून काढतो. पिन लावतो किंवा मग अनवाणी चालत जातो. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, विद्यार्थ्याने रुग्णाच्या बेडशेजारी असलेल्या टेबलावर आपला पाय ठेवला आणि त्याच्या तुटलेल्या चप्पलची पट्टी शस्त्रक्रिया करणाऱ्या सुई आणि धाग्याने शिवण्यास सुरुवात केली, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढे नक्की.

व्हिडीओ नक्की बघा…

छोटीशी शस्त्रक्रिया केल्यासारखे धाग्याचा वापर करून तुटलेल्या चप्पलचे पट्टे शिवण्यास सुरुवात केली. . त्याच्या चेहऱ्याचा मास्क होता आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर करून तो त्याची चप्पल शिवत होता; जशी एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया केली जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dailynews24hr_7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वैद्यकीय विद्यार्थी शस्त्रक्रियेच्या सुई आणि धाग्याने चप्पल शिवताना दिसला’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि ‘डॉक्टर ते मोचीपर्यंतचा प्रवास, असे फक्त भारतात होऊ शकते, ती साधनेच त्याच्या हृदयाच्या अगदी जवळची आहेत, तो कदाचित सराव करतो आहे; आदी कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.