Michael Jacksons Facial Evolution : पॉप स्टार या शीर्षकाला सर्वाधिक प्रसिद्धी ही मायकल जॅक्सनने मिळवून दिली. ‘किंग ऑफ पॉप’ या नावाने जागतिक किर्ती प्राप्त करणा-या या पॉप स्टारला जगाचा निरोप घेऊन १३ वर्षे उलटून गेली आहेत. २५ जून २००९ रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सिंगिंग आणि डान्सव्यतिरिक्त ज्यासाठी मायकल नेहमी लक्षात राहिल, ती गोष्ट म्हणजे त्याचा बदलत गेलेला चेहरा. परंतु, वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी मायकल आपल्या चेहऱ्यासाठी पाण्यासारख्या पैसा खर्च करायचा हे अनेक चाहत्यांना ठाऊक असेल. मायकलने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेकदा शस्त्रक्रियादेखील करून घेतल्या होत्या. त्याने आपल्या चेहऱ्यावर केलेली प्लास्टिक सर्जरी त्याकाळी चर्चेत आली होती. यावरून मायकल टीकेचा धनीही झाला. मायकलने शस्त्रक्रियेने त्याच्या त्वचेचा रंग बदलला. सोबतच चेहऱ्यावरील इतर अवयव जसे नाक, ओठ, डोळे यांवरही शस्त्रक्रिया करून घेतल्या. सध्या सोशल मीडियावर मायकल जॅक्सनच्या चेहऱ्यावरील बदलांचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र भावूक झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा