Mom Desi Jugaad To Win His Son In Race : आई होणे सोपे नाही, असे अनेकदा म्हटले जाते. लाडाने वाढलेल्या मुलीला दुसऱ्याच्या घरी जाऊन प्रत्येक गोष्ट कोणाच्याही मदतीशिवाय करावी लागते. आई झाल्यानंतर तर संपूर्ण आयुष्य आपल्या मुलाच्या सुखासाठी समर्पित करावे लागते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी, मुलाचा हट्ट पुरवताना त्याला योग्य ती शिकवण देणारी ती आईच असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये मुलाला खेळात जिंकवण्यासाठी आईने जुगाड केला आहे.

व्हायरल व्हिडीओत चिमुकल्याच्या शाळेत स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा धावण्याची असते. सगळी मुले धावण्यासाठी तयार असतात. पण, एका चिमुकल्याच्या मनाची अजिबात तयारी नसते. त्याने मैदानात रडून गोंधळ घातलेला असतो. तो आईचा पाय धरून “मला धावायचं नाही”, असा हट्ट करताना दिसतो आहे. पण, आई ती आईच असते. आई आपल्या मुलाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारे तयार करते, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल एवढे तर नक्कीच…

आई शेवटी आईच असते (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, चिमुकल्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा नसतो. तो आईचा पाय घट्ट पकडून, रडून गोंधळ घालत असतो. पण, आपल्या मुलाने स्पर्धेत भाग घ्यावा, अशी आईची इच्छा असते. मग त्यासाठी ती खूप मेहनत घेते, आपल्या मुलाच्या तावडीतून पाय सोडवते आणि मैदानात धावत सुटते. आई पळत सुटते, स्पर्धा सुरू होते. आईला धावताना पाहून चिमुकलासुद्धा धावण्यास सुरुवात करतो आणि अशा प्रकारे चिमुकला स्पर्धेत सहभागी होतो आणि स्पर्धा जिंकतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @viralbox143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आई तिच्या मुलाला जिंकवण्यासाठी काहीही करू शकते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आईचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि “आई होणं सोपं नाही”, “आई शेवटी आईच असते”, “चिमुकला चुकून जिंकला” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत