Viral Video Of Mother And Her Baby : आई आणि मुलांचे नाते हे या जगातील सर्वांगसुंदर नाते आहे, जे कोणत्याही अट, अपेक्षेशिवाय अपार प्रेमाने भरलेले आहे. बाळाला नऊ महिने पोटात वाढवणे, त्यानंतर ते मूल पहिल्यांदा कधी आई बोलणार, पहिल्यांदा कधी चालणार आदी अनेक गोष्टींची ती अगदी आतुरतेने वाट बघत असते. आज सोशल मीडियावर असाच एक क्षण व्हायरल होत आहे. आईने टिक टॉक ट्रेंड शूट करताना चिमुकल्याचा पहिल्यांदा चालण्याचा क्षण कॅप्चर केला, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ ( Viral Video) एक टिकटॉक स्टारचा आहे. आई डारिया अलिजादे हिने तिच्या बाळाचे आणि तिचे काही क्षण चित्रित करण्यासाठी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करून ठेवले. यादरम्यान तिला कल्पना नव्हती की, तिच्या मोबाईलमध्ये एक खास क्षण चित्रित होणार आहे. १६ डिसेंबर २०२४ रोजी आई आणि टिकटॉक स्टार ट्रेंड फॉलो करीत घराची स्वच्छता करत असते. यादरम्यान तिचे बाळ जमिनीवर बसून, तिच्याकडे पाहत असते. जसजसे ते पुढे जाते तितक्यात तिचे बाळ स्वतःच्या पायांवर पहिल्यांदा उभे राहते. तुम्हीसुद्धा बघा हा हृदयस्पर्शी क्षण…

हेही वाचा…माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video

व्हिडीओ नक्की बघा…

आईने नकळत क्षण केला रेकॉर्ड

व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, टिकटॉक ट्रेंडचे चित्रीकरण करताना एका आईने तिच्या बाळाची पहिली पावले कॅप्चर केली. तिने रेकॉर्ड केल्याप्रमाणे घर स्वच्छ करताना तिचे बाळ अचानकपणे उठले आणि ते स्वतःहून पहिल्यांदा स्वतंत्रपणे पावले टाकू लागले. हे पाहताच आईदेखील खाली बसली आणि बाळाला प्रोत्साहन देताना दिसली. त्यानंतर बाळ तोल सावरत आईकडे इवल्याशा पावलांनी चालत जाताना दिसले. हा अनपेक्षित आणि स्पष्ट क्षण जीवनातून नकळत मिळणाऱ्या आश्चर्यांची आठवण करून देतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @briefintel या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये व्हिडीओबद्दल माहिती देण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक नेटकरीसुद्धा या क्षणाचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसले आहेत. तसेच काही आईंना हा व्हिडीओ पाहून, त्यांच्या मुलाबरोबरचे क्षण आठवले आहेत ते कमेंट्समध्ये शेअर करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे.