Video Shows Mother Always Protect Her Child : बदलत्या काळात आई-मुलाचे नाते अजूनही नाही बदलले आहे. चुकल्यावर ओरडणारी, पण त्यापेक्षाही मुले मोठी होताच त्यांच्याबरोबर मैत्रीचे नाते जोडणारी ही आई आज पाहायला मिळते. हे पाहून मुलेही तिच्याबरोबर सगळ्याच गोष्टी शेअर करू लागतात. त्यामुळे केअरिंगपासून ते शेअरिंगपर्यंत हे नाते अगदी वळण घेताना दिसते. आपली भूमिका‌ अगदी निस्वार्थपणे पार पडणाऱ्या आईचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तर आज आईच्या धाडसाची झलक दाखवणारा आणखीन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

आता सर्वत्र लहान मुलांसाठी गेम झोन सुरु झाले आहेत. गेम झोनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध असतात. तर व्हायरल व्हिडीओ सुद्धा गेमिंग झोनचा आहे. येथे आई आपल्या दोन मुलांबरोबर खेळताना दिसते आहे. आई एका मुलाला मांडीवर घेऊन एका गोलाकार टायरमध्ये (डोनट राईड) बसलेली दिसते आहे. वरून धक्का देताच हा गोलाकार टायर घसरगुंडीवरून खाली येऊ लागतो. पण, त्या घसरगुंडीच्या मध्येच आईची मुलगी उभी असते. आई वेगात येते आहे हे पाहून तिला नक्की कुठे जायचे समजत नसते आणि येथेच एक ट्विस्ट येतो. नक्की काय ट्विस्ट येतो व्हायरल विडिओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
elephant and her baby viral video
अरेरे! पिल्लाला झोपेतून उठवणारी आई; कधी सोंड, तर कधी शेपटी ओढत प्रयत्न सुरू; Viral Video पाहून आवरणार नाही हसू
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
Aai kuthe kay karte fame Rupali Bhosale bought a new mercedes benz
Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…”
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल


व्हिडीओ नक्की बघा…

मुलगी शॉक,आई रॉक्स!

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई आपल्या मुलांबरोबर गेमिंग झोनमध्ये खेळताना दिसते आहे. आई आपल्या मुलाला एका गोलाकार टायरमध्ये बसवते आणि घसरगुंडीवरून घसरत खाली येते. तितक्यात ती पाहते की, समोर तिची इवलीशी चिमुकली उभी असते. चिमुकली आईला वेगात येताना पाहते आणि घाबरते तर नक्की कुठे जाऊ हे तिला कळतंच नसते. तितक्यात आई वेगात येऊन, बरोबर अंदाज घेऊन चिमुकलीला उचलते आणि राईडमध्ये बसवते, जे खूपच कौतुकास्पद आहे.

वेगात येणारी राईड चिमुकलीला आदळू शकली असती. पण, आईने वेळीच युक्ती करून चिमुकलीला सुद्धा राईडमध्ये बसवले आणि येथेच व्हिडीओचा शेवट झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr_creator40 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आई’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आईचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘चिमुकलीला नक्की कोणत्या बाजूला जावे हे समजत नव्हते, आई आहे ना, खूप क्युट व्हिडीओ आहे’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

Story img Loader