Video Shows Mother Always Protect Her Child : बदलत्या काळात आई-मुलाचे नाते अजूनही बदलले आहे. चुकल्यावर ओरडणारी, पण त्यापेक्षाही मुले मोठी होताच त्यांच्याबरोबर मैत्रीचे नाते जोडणारी ही आई आज पाहायला मिळते. हे पाहून मुलेही तिच्याबरोबर सगळ्याच गोष्टी शेअर करू लागतात, त्यामुळे केअरिंगपासून ते शेअरिंगपर्यंत हे नाते अगदी वळण घेताना दिसते. आपली भूमिका‌ अगदी निस्वार्थपणे पार पाडणाऱ्या आईचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तर आज आईच्या धाडसाची झलक दाखवणारा आणखीन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता सर्वत्र लहान मुलांसाठी गेम झोन सुरू झाले आहेत. गेम झोनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध असतात; तर व्हायरल व्हिडीओसुद्धा गेम झोनचा आहे. येथे आई आपल्या दोन मुलांबरोबर खेळताना दिसते आहे. आई एका मुलाला मांडीवर घेऊन एका गोलाकार टायरमध्ये (डोनट राईड) बसलेली दिसते आहे. वरून धक्का देताच हा गोलाकार टायर घसरगुंडीवरून खाली येऊ लागतो. पण, त्या घसरगुंडीच्या मध्येच आईची दुसरी मुलगी उभी असते. आई वेगात येते आहे हे पाहून तिला नक्की कुठे जायचे समजत नसते आणि येथेच एक ट्विस्ट येतो. नक्की काय ट्विस्ट येतो, व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…


व्हिडीओ नक्की बघा…

मुलगी शॉक,आई रॉक्स!

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, आई आपल्या मुलांबरोबर गेम झोनमध्ये खेळताना दिसते आहे. आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन एका गोलाकार टायरमध्ये बसते आणि घसरगुंडीवरून घसरत खाली येते. तितक्यात ती पाहते की, समोर तिची इवलीशी चिमुकली उभी असते. चिमुकली आईला वेगात येताना पाहते आणि घाबरते; तर नक्की कुठे जाऊ हे तिला कळतंच नसते. तितक्यात आई वेगात येऊन, बरोबर अंदाज घेऊन चिमुकलीला उचलते आणि राईडमध्ये बसवते, जे खूपच कौतुकास्पद आहे.

वेगात येणारी राईड चिमुकलीला आदळू शकली असती, पण आईने वेळीच युक्ती करून चिमुकलीलासुद्धा राईडमध्ये बसवले आणि येथेच व्हिडीओचा शेवट झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr_creator40 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आई’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आईचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘चिमुकलीला नक्की कोणत्या बाजूला जावे हे समजत नव्हते, आई आहे ना, खूप क्युट व्हिडीओ आहे’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows mother always protect her child she picks up the toddler with a correct guess and puts her on the ride asp