Video Shows Mother And Pet Cat Cute Bonding : आई ही आईच असते. मग ती माणसाची असो किंवा प्राण्याची. आईच्या प्रेमापुढे जगातील प्रत्येक प्रेम लहान आहे. आई आपल्या मुलांच्या फायद्यासाठी प्रत्येक वेदना सहन करण्यास तयार असते. आयुष्यामधील आनंदाची आणि दु:खाची काळजी न घेताही आई आपल्या मुलांच्या सांत्वन आणि आनंदाची काळजी घेते. आज या व्हायरल व्हिडीओत आई आणि पाळीव मांजरीचे सुंदर नाते बघायला मिळाले आहे. नक्की आई आणि मांजर यांच्यात संवाद काय सुरू आहे ते चला जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओत पाळीव मांजर फ्रिजवर बसलेली दिसते आहे. आई भांडी घासायला जात असते. तितक्यात आई मांजरीला बघून ‘चल, भांडी घासायला’, असे गमतीत म्हणते. त्यानंतर मांजर आपल्या पंजाच्या साह्याने मारताना दिसते. पुन्हा एकदा मांजरीला चिडवण्यासाठी ‘चल, भांडी घासायला’ म्हणते. तेव्हा मांजर पुन्हा एकदा पंजाच्या साह्याने डोक्यावर मजेत मारते. त्यानंतर आईचा लेक म्हणतो, “बघ, तुला आशीर्वाद देते आहे”. तुम्हीसुद्धा बघा आई आणि मांजरीमधील मजेशीर व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, आई पाळीव प्राण्यांना आजारी असल्यावर किंवा एखादी चुकीची गोष्ट केल्यावर तर कधी चांगली गोष्ट केल्यावर अगदी मुलाप्रमाणे वागवते. तर व्हिडीओतसुद्धा तसेच काहीसे दिसून आले. आई आणि पाळीव मांजर खेळताना दिसते आहे. आई मांजरीची खोड काढते आहे आणि मांजरसुद्धा तिला अगदी मजेशीर प्रतिसाद देते आहे. कधी मांजरीच्या डोक्याला डोके लावून, तर कधी तिच्याकडे बघून, तर कधी तिला भांडी घासायला चल म्हणून अगदी मजेशीर पद्धतीने खेळताना दिसते आहे. हे पाहून आईच्या लेकाने हा क्षण शूट करून घेतला आहे.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_bobby_0027 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आईचं प्रेम आणि मांजरीचं नातं हे वेगळंच असतं’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून, ‘हे सुख फक्त कोकणात’, ‘आई आणि मुलगा ❌ आई आणि मांजर ✅’ , ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, ‘शेवटी आई ही आईच असते’, ‘आईची लेकरावरची माया, प्रेम कधीच कमी होत नाही’ ; अशा कमेंट्स व्यक्त करीत आहेत.