Viral Video Shows Mother in law taking Daughter In Law’s Photo : सासू आणि सून म्हणजे घर, कुटुंब, नाती जपणाऱ्या दोन व्यक्ती. या दोघी कधी मैत्रिणी, तर कधी मायलेकी, तर कधी एकमेकींच्या शत्रूही असतात. कधी भांडण करतात, तर कधी एकमेकींना मदतही करतात, कधी दोघीही बरोबर, तर कधी दोघी चुकीच्या असतात. तर, आज सोशल मीडियावर सासू-सुनेच्या नात्याचा असाच एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये हळुवार नाती जपणाऱ्या दोघींचं एक अनोखं रूप पाहायला मिळालं आहे. काय आहे या व्हिडीओत (Viral Video) खास चला जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्त्रीरोग तज्ज्ञ पवित्रा बालकृष्णन या वृंदा पाटी डॉक्टरांची सून असतात. एका कार्यक्रमात पवित्रा बालकृष्णन महिलांशी संवाद साधत असते. यादरम्यान वृंदा पाटीसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. तर, कार्यक्रमात जेव्हा डॉक्टरांची सून इतरांशी संवाद साधत असते, तेव्हा मागे खुर्चीवर बसून सासू बॅगेतील फोन काढतात आणि त्यांच्या मोबाईलमध्ये सुनेचा फोटो काढतात. त्यानंतर तो फोटो व्यवस्थित तर आला आहे ना हेसुद्धा अगदी निरागसपणे पाहतात. तर कार्यक्रमात उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा क्षण तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला. तर हे पाहता, सासूचे कौतुक करीत सुनेने कॅप्शन लिहिली. नक्की व्हायरल व्हिडीओच्या (Viral Video) कॅप्शनमध्ये काय लिहिले आहे ते तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…शिक्षणाला नसते वयाचे बंधन! वयाच्या पन्नाशीत एलएल.बी. करणाऱ्या त्या दोघांना विद्यार्थ्यांनी दिलं सरप्राईज; VIDEO जिंकेल तुमचे मन

व्हिडीओ नक्की बघा…

माझ्यासाठी हा क्षण अनमोल

तर हा खास क्षणाचा सुनेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रील शेअर केला आहे. तसेच माझ्या सासूला भेटा! हे कदाचित अनेकांना समजणार नाही; पण माझ्यासाठी हा अनमोल क्षण आहे, जो मला कायम जपायचा आहे. अनेक जण तिला डॉक्टर म्हणून ओळखतात; पण मी आज वृंदा पाटीची ओळख करून देते. “एक दयाळू आणि परफेक्ट स्त्री; जी तिच्या सगळ्या गोष्टी अगदी सहजतेने हाताळते. केवळ प्रेमाने स्वतःला आणि इतरांना सक्षम करणारी स्त्री,” अशी कॅप्शन सुनेने लिहिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) @well_women_clinic आणि @ _prajiamma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओवर मजकूर लिहिण्यात आला आहे, “जेव्हा मी म्हणते की, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सक्षम बनवते, तर ही गोष्ट मी सासूकडून शिकले. ती या गोष्टीचे एक उदाहरण आहे’. व्हिडीओ पाहून अनेक जण सुनेला भाग्यशाली म्हणत आहेत. तर, काही जण देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो, असे म्हणत सासू-सुनेच्या नात्याचे अनोखे रूप पाहून विविध शब्दांत त्यांचे कौतुकदेखील करीत आहेत.