Pet Dog And Mother Viral Video : खूप दिवस मजा-मस्तीत गेले किंवा आपण काही दिवस खूप आनंदी असलो की, आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडते. घरात भांडण होते, घरातील एखादा सदस्य आजारी पडतो, लहान मुले खूप चिडचिड करतात आदी अनेक गोष्टी घडतात. मग घरातील आई किंवा आजीला आपण याबद्दल चुकूनही सांगितले, तर मग त्या लगेच ‘आता तुझी नजर काढावी लागेल’, असे अगदी काळजीपोटी म्हणतात. तर तुम्ही आतापर्यंत माणसांची नजर काढलेली पाहिली असेल. पण, कधी प्राण्यांची नजर काढलेली पाहिली आहे का? नाही… तर आजच्या व्हायरल व्हिडीओत नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत घरात लादीवर छोटेसे श्वानाचे पिल्लू बसले आहे आणि त्या पिल्लासामोर आईसुद्धा उभी आहे. श्वानाचे पिल्लू आजारी असते. तेव्हा आई स्वयंपाकघरातून मिठाची बरणी घेऊन येते. आई बरणीतून चमचाभर मीठ काढते आणि हातात घेते. त्यानंतर लादीवर बसलेल्या श्वानाच्या पिल्लाच्या डोक्याभोवती फिरवते आणि नजर काढताना दिसते. आईने नजर काढताच श्वानाने कशी प्रतिक्रिया दिली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

तेव्हा दृष्ट काढली जाते…

एखादे मूल सतत काही दिवस आजारी पडले असेल आणि औषधांचा कोणताच परिणाम आपल्या मुलावर होत नाही हे पाहिल्यावर आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी आणि आईच्या मनाच्या समाधानासाठी आई नजर ही काढतेच. त्याचेच प्रात्यक्षिक व्हायरल व्हिडीओत दिसले. तुम्ही पाहिले असेल की, आई श्वानाची नजर काढते आहे. आई नजर काढताना तिचे हातवारे पाहून श्वानाचे पिल्लूदेखील मान डोलावते आहे आणि आईच्या मागून फिरतानासुद्धा दिसते आहे, जे पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sweety_edittz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आई ती आईच’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “जेव्हा औषध काम करीत नाही तेव्हा दृष्ट काढली जाते”, “ती आई आहे, ती कुठे हार मानते”, “भाऊ, अशी आई आपल्याला मिळणे हे भाग्य”, “ही शेवटची पिढी आहे”, “सगळे इन्स्टाग्राम युजर्स खुश झाले”, “आई ती आई असते, तिच्यासाठी सगळी मुले समान असतात” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.