Video Shows Anand Mahindra Excited To See Elevated Nature Trai : मुंबईतील मलबार हिलच्या हिरवळीत वसलेले एक नव इको-टुरिझम आकर्षण म्हणजे एलिव्हेटेड नेचर ट्रेल (elevated nature trail). गुढीपाडव्याला एलिव्हेटेड नेचर ट्रेलचे उदघाटन झाले आहे. सध्या अनेक जण ‘एलिव्हेटेड नेचर ट्रेल’ला भेट देण्याची उत्सुकता दर्शविताना दिसत आहेत. याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रासुद्धा या खास ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. पण, यामागचे कारणसुद्धा खास आहे आणि याचा खुलासा त्यांनी कॅप्शनमधून केला आहे.
एखादे ठिकाण आपल्या घराजवळ असेल तर कोणताही प्रवास न करता त्या ठिकाणाला भेट देण्याचा आनंद काही वेगळाच असतो. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे एलिव्हेटेड नेचर ट्रेलला भेट देण्याबाबत उत्साह व्यक्त केला आणि म्हटले की, या नवीन ठिकाणाने त्यांच्या यादीत (बकेट लिस्टमध्ये) अधिकृतपणे स्थान मिळवले आहे. कारण एलिव्हेटेड नेचर ट्रेल हे मुंबईत असून आनंद महिंद्रांच्या अगदी घराजवळच आहे. नक्की आनंद महिंद्रा व्हिडीओ शेअर करत काय म्हणाले चला बघूया…
पोस्ट नक्की बघा…
बृहन्मुंबई महानगरपालिकेने एलिव्हेटेड नेचर ट्रेलची एक छोटीशी झलक त्यांच्या एक्स (ट्विटर) वरील व्हिडीओत दाखवली आहे; तर हा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @anandmahindra अकाउंटवरून रिपोस्ट करत लिहिले, ‘माझ्या बकेट लिस्टमधील एक ठिकाण, मला माहीत आहे की मी या ठिकाणाला नक्की भेट देईन…, निसर्गाचे सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रवास करावा लागत नाही हे जाणून आनंद होतो’; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे.
किंमत केवळ २५ रुपये (Viral Video)
एलिव्हेटेड नेचर ट्रेल लाकूड आणि कमीत कमी काँक्रीटपासून बनवण्यात आला आहे. या मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. महापालिकेने माहिती दिली की, या मार्गाचा वापर एकावेळी फक्त २०० लोकच करू शकणार आहेत. तसेच पर्यटकांना https://naturetrail.mcgm.gov.in/ या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्लॉट बुक करता येणार आहेत आणि तिकिटाची किंमत केवळ २५ रुपये आहे. नोंदणी केल्यानंतर ऑनलाइन तिकिटावर एक बारकोड जनरेट केला जाईल, ज्याद्वारे प्रवेश आणि बाहेर पडणे नियंत्रित केले जाईल.