Viral Video Shows Neighbour’s Love : बदलत्या काळानुसार कुटुंबे छोटी होत गेली. अनेकांच्या घरी नवरा-बायको आणि मुले एवढेच सदस्य असतात. त्यामुळे अनेकदा मुलांना घरात एकटे कसे ठेवून जायचे हा प्रश्न मनात फिरत असतो. त्यामुळे नवीन घर घेताना आपण शेजारी कोण राहतोय हे आवर्जून पाहतो. त्यामुळे नवीन घर घेताना आपण शेजारी कोण राहतोय हे आवर्जून पाहतो. दरवाजाच्या बाहेर आणि आत सिक्युरिटी, कॅमेरे, नाही तर काही विश्वासू माणसे आजूबाजूला असणे देखील गरजेचे असते.. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चिमुकलीच्या कृत्याने तिचे शेजारी राहणारे काही रहिवासी खूश झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओत (Viral Video)अर्जुन या इन्स्टाग्राम युजरचे घर दाखवण्यात आले आहे. त्याच्या शेजारी एक चिमुकली राहत असते. चिमुकलीला अर्जुनच्या घरी एक श्वान राहत असतो हे माहिती असते. तर चिमुकली श्वानासाठी एक खास भेटवस्तू घेऊन जाते. चिमुकली अर्जुनच्या घरी एक कागद घेऊन जाते. अर्जुन तो कागद पाहून खूप खूश होतो, कारण त्या कागदावर अर्जुनच्या श्वान गोल्डीचे चित्र असते. हे चित्र अर्जुनला भरपूर आवडते आणि तो हे चित्रे फ्रिजवर चिटकवतो. तर चिमुकलीने काढलेले चित्र एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, फ्रिजवर चिमुकलीने काढलेले चित्र चिटकवताच चिमुकली आणखीन एक चित्र घेऊन येते. या चित्रात गोल्डी तर असतोच, पण गोल्डीबरोबर अर्जुनसुद्धा असतो. हे पाहून अर्जुन भारावून जातो आणि दुसरे चित्रसुद्धा फ्रिजवर चिटकवून ठेवतो. त्यानंतर सगळ्यांनी घरात बोलावल्यावरच चिमुकली घरात येते आणि फ्रिजवर चिटकवलेली चित्रे अर्जुन चिमुकलीला दाखवतो. चिमुकली चित्र पाहून खूश होते आणि अर्जुनला थँक यू म्हणते आणि इथेच व्हिडीओचा गोड शेवट होतो.
एका आर्टिस्टला आणखीन काय हवं
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @arjun_sanchari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आज आमच्या शेजारची मुलगी गोल्डीला सरप्राईज घेऊन आली होती’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. ‘एका आर्टिस्टला आणखीन काय हवं असतं, तुम्ही केलेली तिची प्रशंसा तिला कायम लक्षात राहील, तुम्ही तिच्या भावनांची कदर केली हे बघून खूप छान वाटले’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत.