Viral Video : लग्नमंडपात गाडी हॉलवर घेऊन जाताना सजवली जाते. लग्न असलेल्या उत्सवमूर्तींसाठी ही सगळी तयारी असते. याच हौसेपोटी गाडी सजावटीच्या भन्नाट कल्पना वापरल्या जातात. गाडीच्या बॉनेट, छतावर एक बुके, दारांवर ओढण्यांच्या कापडाची डिझाईन, सेलो टेप वापरून चिकटवलेली गुलाबाची फुले, थर्माकोलच्या बदामात लिहिलेली नावं आदींद्वारे वर वा वधूसाठी अथवा नवदाम्पत्यासाठी गाडीवर सजावट करण्यात येते, असे आपण वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये चक्क पानांची डिझाईन करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) इंदूर मध्य प्रदेशचा आहे. रस्त्यावर अनेक वाहनांची वर्दळ दिसते आहे. अशातच एका गाडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लग्नाच्या गाड्या ज्या नवविवाहित जोडप्यांना कार्यक्रमस्थळी घरी घेऊन जातात, त्या बहुतेक वेळा फुलांनी वा इतर वस्तूंनी सजवल्या जातात. मात्र, ही गाडी फक्त पानांनी सजवली होती. नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्यासाठी सजविलेल्या या गाडीला पाहून नागरिकसुद्धा आश्चर्य व्यक्त करताना दिसले. ही गाडी कशी सजवण्यात आली आहे ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘आहा टमाटर बड़े मजेदार…’ शिक्षकांना दिली अनोखी ट्रेनिंग; VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा…

तत्काळ लग्नाची ऑर्डर होती…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून एक गाडी जाते आहे. नवरा-नवरीच्या लग्नाच्या गाडीला गुलाब, रंगीबेरंगी धाग्यांनी सजविण्याऐवजी ती फक्त पानांनी सजविल्याचे दिसत आहेत. अनेक पानांनी सजलेली ही गाडी पाहून दुचाकीस्वारसुद्धा चकित झाले आणि गाडीकडे एकटक बघताना दिसले. सजावट करणाऱ्या व्यक्तीने चारचाकी वाहनावर झाडांची भलीमोठी पाने तोडून लावली आहेत. सजावट आकर्षक न वाटल्यामुळे सजावटीकडे अनेक जण आश्चर्याने बघताना दिसले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rishavyadav26_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “तत्काळ लग्नाची ऑर्डर होती; पण आयत्या वेळी फुले न मिळाल्याने गाडी पानांनी सजवून काम चालवून घेतलं. कारण- लग्न महत्त्वाचे आहे”, असा मजूकर व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना लोकप्रिय गाणं ‘दिल गार्डन गार्डन हो गया’ची आठवण झाली. एक युजर म्हणतोय, “दिल नहीं, गाडी गार्डन गार्डन हो गयी”, तर दुसरा म्हणतोय, “जंगल सफारी”, “कृषी विभागातून आला आहे हा”, आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows newly wed couples car decked up with not roses and colourful threads but leaves asp