बेशिस्त वाहनचालकांचे आणि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिस दंड आकरून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान एका पाकिस्तानी महिलेने थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर कार चढवल्याचे व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान महिलेला अटक करण्यात आली आहे आणि आरोप दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घालताना दिसत आहे. महिला वेगात वाहन चालवत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तिला अडवले होते. वाहतूक पोलिसांनी तिच्याकडून वेगात वाहन चालवल्याबद्दल दंड आकरण्याचा प्रयत्न करत आहे. महिला काहीही न ऐकता थेट तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. जेव्हा एक वाहतूक पोलिस तिला अडवण्याचा प्रयत्न करतात ही महिला थेट त्याच्या अंगावर गाडी चढवते. वाहतूक पोलिसाला उडवून ही महिला भरधाव वेगात तेथून निघून जाते. दरम्यान हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फराह हिला २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.
हेही वाचा – चिमुकल्यावर माकडाचा हल्ला! खांद्यावर चढून थेट….पाहा थरारक Viral Video
जिओ न्यूजच्या (Geo News) वृत्तानुसार, “इस्लामाबाद ट्रॅफिक पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली की, “ही घटना १ जानेवारी, २०२४ रोजी घडली आणि आरोपी ड्रायव्हरला अटक करण्यात आले आणि आरोप लावण्यात आले,”
व्हायरल व्हिडीओमध्ये महिला पोलिसांवर ओरडत आहे, आदराने बोला, फालूत काही बोलू नका, तोंड बदं करा, तुमच्या वर्दीचा आदर करा”
पोलिस अधिकाऱ्याने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्याला एक क्षणही बोलू न देता ती तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली. गाडीसमोर उभ्या असलेल्या पेट्रोलिंग ऑफिसर मुहम्मद साबीरला हलवाय याने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. तिने मुहम्मद यांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा ती गाडी सुरू केली आणि त्याला उडवून निघून गेली. पोलिस अधिकाऱ्याला जखमी करून ती महिला तेथून पसार झाली.
हेही वाचा – सहा महिन्यानंतर नोकरी सोडून का जातात कर्मचारी? HR Executiveने केला मोठा खुलासा
व्हायरल व्हिडिओमुळे तीव्र संताप निर्माण झाला, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिलेच्या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला. बुधवारी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर जारी केलेल्या निवेदनात रावळपिंडी येथील पोलिसांनी सांगितले की, “नशीराबाद पोलिस स्टेशनमध्ये २ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी ही महिला फरार झाली होती.”
एसएसपी ऑपरेशन्सच्या नेतृत्वाखाली आरपीओ रावळपिंडी बाबर सरफराज अल्पा यांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष टीम तयार केली होती. नशिराबाद पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींचा माग काढला, असे निवेदनात म्हटले आहे.
“कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर अंदाधुंद कारवाई केली जाईल, ”रावळपिंडी पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.