Man Drives Cab After Driver Falls Asleep : ओला, उबर, रॅपिडो आदी विविध कंपन्यांचे चालक आपल्याला कमीत कमी वेळेत, आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यास मदत करतात. पावसाळा, उन्हाळा किंवा हिवाळा असो; प्रत्येक ऋतूत हे चालक आपल्या सेवेसाठी हजर असतात. दिवस-रात्र प्रवाशांच्या सेवेत असणारे हे कॅब ड्रायव्हर आपल्यासारखेच दमूनही जात असणार, आपल्यासारखीच केव्हा केव्हा त्यांचीही झोप अपूर्ण राहत असेल. तर आज सोशल मीडियावर यासंबंधीचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कॅब ड्रायव्हरला भरपूर झोप आल्यामुळे प्रवाशाने त्याला विशेष मदत केली आहे.
तर गोष्ट अशी की, स्टार्टअप संस्थापक व आयआयएम पदवीधर, मिलिंद चंदवानी रात्री उशिरा बंगळुरू विमानतळावरून घरी जात होते. तेव्हा त्यांनी कॅब बुक केली; पण कॅब ड्रायव्हरला खूप झोप येत होती. त्यामुळे तो चहा आणि सिगारेट पिण्यासाठी थांबला; पण तरीही त्याचे डोळे काही केल्या उघडत नव्हते. म्हणून मिलिंद यांनी, मी गाडी चालवू का, असे विचारले. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. कारण- “बंगळुरू ट्रॅफिक” असे बोलण्याआधीच कॅब ड्रायव्हरने मिलिंदच्या हातात गाडीची चावी दिली. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ…
हेही वाचा…इलेक्ट्रिक कार भर रस्त्यात पडली बंद! जुगाड करून बैलगाडीने नेली ओढत; पाहा Viral Video
व्हिडीओ नक्की बघा…
त्यानंतर दोघांनी जागा बदलल्यावर ड्रायव्हर झोपी गेला आणि मिलिंद यांना गूगल मॅप मार्गदर्शन करताना दिसला. मिलिंद घरी पोहोचण्याच्याआधी पाच मिनिटे आधी कॅब ड्रायव्हरने त्याच्या बॉसला कॉल केला. तेव्हा त्याने बॉसकडे दिवसाची शिफ्ट मागितली. कारण- तो रात्रीची शिफ्ट करू शकत नाही. कॅब ड्रायव्हरने मिलिंदवर विश्वास दाखवून त्याला गाडी चालवण्यास दिली या भावनेने मिलिंद सुद्धा खुश झाला. त्याने घरी पोहचताच मिलिंदने १०० रुपयांची टीप आणि ५ स्टार रेटिंगसुद्धा दिली.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @milindchandwani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘काल रात्री ३ वाजता बंगळुरू विमानतळावरून घरी येत असताना, मी स्वतःला एका अनपेक्षित भूमिकेत पहिले. माझ्या कॅब ड्रायव्हरचा ड्रायव्हर… जीवन अनपेक्षित मार्गांनी भरलेले आहे. दयाळू व्हा, सहानुभूती दाखवा आणि कदाचित तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्यावरसुद्धा लक्ष द्या. कारण- हे कधी उपयोगी पडेल ते तुम्हाला माहीत नाही. मला त्या ब्रॅण्डचे नाव सांगायचे नाही. कारण- त्याचा कॅब ड्रायव्हरवर परिणाम होऊ शकतो’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.