people taking selfies too close to a volcanic eruption : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक लोक ज्वालामुखीच्या उद्रेकाजवळ उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओने अनेकांना अस्वस्थ केले आहे. व्हिडीओमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये टेकडीवरून ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. मात्र लोक जीव वाचवण्यासाठी तिथून दूर जाण्याऐवजी चक्क चेहऱ्यावर स्माईल देत सेल्फी काढण्यात व्यस्त होते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लोकांचा एक ग्रूप ज्वालामुखी स्फोटाच्या ठिकाणाजवळ उभा राहून व्हिडीओ आणि फोटो काढताना दिसत आहे. मात्र लाव्हा खालच्या दिशेने वाहून येताना दिसतो. हे पाहून काही पर्यटक सेल्फी आणि व्हिडीओ बंद करून आपला जीव वाचवण्यासाठी तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. पण हौशी मंडळी त्याच ठिकाणी उभं राहून सेल्फीच्या नादात आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.

आणखी वाचा : उगाच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत नाहीत…हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

हा व्हिडीओ व्हायरल हॉगने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. इतका भयानक ज्वालामुखी असून लोक तिथे सेल्फी काढताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिण्यात आलीय. “हे आरामासाठी थोडं जवळचं वाटतं.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत लोक पूर्णपणे चिंतित झाले आहेत.

आणखी वाचा : नशेत धुंद महिलेचा VIDEO VIRAL, उभंही राहता येत नव्हतं….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रस्त्यावर काम करून पक्ष्यांची भूक भागवतो हा व्यक्ती, मनाला भावणारा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ पाहून लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ शेअर करून अवघे आठ तासच झाले आहेत, तरीही या व्हिडीओला आतापर्यंत ३३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “तुमचा फोन खिशात ठेवा आणि पळा!” हे लोक स्फोटाच्या अगदी जवळ उभे राहून त्यांच्या जीवाशी खेळत होते, असं वाटतं नाही का? असं देखील काही यूजर म्हणाले.

Story img Loader