Viral Video Shows Pet Dog and Grandma’s Bond : रस्त्यावर भटक्या श्वानांना घाबरणारी माणसं घरात पाळीव श्वान आल्यावर मात्र त्याला अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात. त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी राऊंड मारायला घेऊन जातात, घरी आल्यावर त्यांच्याशी अगदी लहानमुलांप्रमाणे खेळतात. तसेच श्वानाचा वाढदिवस असो किंवा मालकाचा दोघेही आनंदात साजरा करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, यामध्ये आजी गाणं म्हणते आहे आणि गाण्याचा तालावर श्वान ठेका धरताना दिसत आहे.
आजी व नातवाचं नातं कसं असतं हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. गाणी, गोष्टी सांगणारी आजी ही नातवाची बेस्ट फ्रेंड असते. पण, आज व्हिडीओत असंच काहीस नातं श्वान व आजीचं दिसते आहेत. आजी व्हीलचेअरवर बसल्या असून त्याच्या समोर पाळीव श्वान बसला आहे. आजी टाळ्या वाजवत एक गाणं म्हणते आहे आणि हे गाणं ऐकून श्वान अगदी लहानमुलांसारख्या उड्या मारतो आहे. श्वानाने गाणं ऐकल्यावर कश्या उड्या मारल्या व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
जेव्हा तुमचा श्वान आणि आजी बेस्ट फ्रेंड असतात…
श्वानाचे माणसांशी खूप खास नाते असते. हे माणसाचे चांगले मित्र असतात, जे नेहमी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बरोबर उभे असतात. त्यांच्या हसत्या, खेळत्या स्वभावाने तुम्ही काही क्षणासाठी स्वतःचे दुःख विसरून जाता. तर आज असंच काहीस व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. आजी व श्वानाच्या या खास नात्याने आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. माणसांवर हल्ला करणाऱ्या या श्वानाचं अनोखं रूप पाहायला मिळालं आहे. श्वान एका लहान मुलासारखा बसून डोकं हलवत, तर कधी पाय हलवत नाचताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @animal.care_love या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुमचा श्वान आणि आजी बेस्ट फ्रेंड असतात’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. श्वानाचे हे अनोखं रूप पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत. काही जण व्हिडीओखाली हसण्याच्या इमोजीसह मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तर काही जण श्वानाला लहान बाळ म्हणायला दिसत आहेत. एकूणच या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत.