Viral Video Shows Pet Dog Help Her Owner : आपल्या घरी एखादा प्राणी पाळणे असे अनेकांचे स्वप्न असते. मग त्या प्राण्याला घरातील एक सदस्य म्हणूनच ठेवणे, त्याच्याबरोबर फिरणे, त्याला आवडीच्या वस्तू खाऊ घालणे ते त्याला माणसांप्रमाणे त्याला कपडे विकत घेणे आदी अनेक गोष्टी आपल्यातील बरेच जण करत असतात. अनेकांच्या घरी पाळीव कुत्रा असल्याचे पाहायला मिळते. कारण – श्वान हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी, मदत करण्यासाठी तो कोणतीही जोखीम पत्करायला तयार असतो. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मालकिणीची मदत करताना श्वान दिसला आहे.

व्हायरल व्हिडीओच्या (Viral Video) सुरुवातीला मालकीण, तिची लेक आणि तिचा पाळीव श्वान दिसतो आहे. मालकिणीला भिंतीवर ठेवलेली काठी काढ्याची असते. पण, ही काठी उंचावर असल्यामुळे तिचा हात पोहचत नसतो. ती अनेकदा ही काठी काढण्याचा प्रयत्न करते. पण, ती अयशस्वी ठरते. तर ही गोष्ट पाळीव श्वान पाहतो आणि तिची मदत करण्यासाठी पुढे येतो. पाळीव श्वान नक्की कशाप्रकारे आपल्या मालकिणीची मदत करतो हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन

हेही वाचा…JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

व्हिडीओ नक्की बघा…

मैं हूँ ना…

व्हायरल व्हिडीओत (viral video) तुम्ही पाहिलं असेल की, काठी काढण्यासाठी श्वान भिंतीच्या खाली असणाऱ्या कठड्यावर उडी घेतो आणि तोंडावाटे काठी उचलतो. हे पाहून मालकीण खुश होते आणि श्वानाला उचलून घेते आणि खाली जमिनीवर उतरवून ठेवते. श्वानाचे असे बरेच व्हिडीओ मालकिणीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच या व्हिडीओला ‘मैं हूँ ना’ हे गाणं जोडण्यात आलं आहे आणि हा व्हिडीओ या गाण्याचा खरा अर्थ आहे अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @cute__dogsofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांचे पाळीव श्वान अशा परिस्थितीत कसे वागतात याचे वर्णन करताना दिसले आहेत. तर काही श्वानाचे कौतुक करताना कॅमेटमध्ये दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader