Viral Video Shows Man Protecting Dog From Standing Rain Water: श्वान हा सर्वांत इमानदार प्राणी आणि माणसांचा जवळचा मित्र मानला जातो. आपल्या मालकाची साथ हा प्राणी शेवटपर्यंत देतो. वेळप्रसंगी एकमेकांची मदत करण्यासाठी मालक असो किंवा हा इमानदार प्राणी आपला जीव धोक्यात घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. तसेच याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून श्वानाला घेऊन जाण्यासाठी त्याच्या मालकाने अजब उपाय शोधून काढला आहे.

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओत एक तरुण कारमधून अगदीच विचित्र पद्धतीने उतरताना दिसत आहे. कार जिथे उभी असते तिथे पावसाचे पाणी साठल्याचे दिसत आहे. या पावसाच्या पाण्यात हात टेकवून, पाय हवेत ठेवून तो सुरुवातीला दरवाजा बंद करतो. नंतर हा तरुण पाण्यातून चालण्यास सुरुवात करतो. पाण्यात हात टेकवून, पाय हवेत ठेवून तो पाणी साठलेल्या परिसराच्या पलीकडे पोहोचतो. पण, नंतर स्वतःच्या जॅकेटमधून जे काढतो, ते पाहून तुम्हाला हसूही येईल आणि आश्चर्यही वाटेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…VIRAL VIDEO: भरपावसात हत्ती व माहूत निघाले फेरफटका मारायला; हातात छत्री घेऊन, निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या दोघांचा हा जादुई क्षण पाहा

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा :

https://www.instagram.com/reel/C9l2InUIXEH/?igsh=YzRyNTYwd3hzMW4%3D

मालकाने लढवली शक्कल :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, तरुण रस्त्यावर साठलेल्या पावसाच्या पाण्यातून अगदीच विचित्र पद्धतीने चालताना दिसत आहे. पण, यामागचे कारणही रंजक आहे. कारण- त्याने आपल्या जॅकेटमध्ये त्याच्या पाळीव श्वानाला सुखरूप ठेवलेले असते. पाळीव प्राण्याला चालत घेऊन गेला असता, तर साठलेल्या पाण्यात त्याचे पायसुद्धा खराब झाले असते. तसेच त्याला घरीसुद्धा तेच अस्वच्छ पाय घेऊन जावे लागले असते. म्हणून बहुतेक पाळीव प्राण्याच्या मालकाने ही शक्कल लढवली असेल.

रस्त्याच्या पलीकडे जाताच पाळीव प्राण्याचा मालक श्वानाला जॅकेटमधून काढतो आणि त्याला चालवत घरी घेऊन जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shawn_cnhk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तरुणाला असे विचित्र तऱ्हेने चालताना पाहून, त्याच्या जॅकेटमध्ये श्वान असेल, असे मला कधीच वाटले नव्हते, अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहून काही नेटकरी मालकाला सलाम करताना दिसत आहेत; तर काही जण पोट धरून हसत आहेत. एकूणच मालकाकडून श्वानाचे लाड होताना दिसत आहेत.

Story img Loader