Video Shows Parents Sitting With Pet Dog On Bike : लहानपणी आई-बाबांकडे तुमच्यातील प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केलाच असेल. मग ते दुकानातील कपडे घ्यायचे असो किंवा चॉकलेट, तर कधी आई-बाबांबरोबर बाईकवरून जाण्याचा हट्ट असो. तर कधी कधी या हट्टामुळे आपल्याला ओरडा किंवा मार पडायचा, तर कधी हा हट्ट नकळत पुरवला जायचा; तर आज असेच एक दृश्य पाहायला मिळाले आहे. पण, आज हा हट्ट चिमुकल्याचा नाही तर लाडक्या श्वानाचा पूर्ण करण्यात आला आहे, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एक जोडपे गाडीवरून कुठेतरी जात असते. पण, त्यांच्या घरी राहणाऱ्या त्यांच्या पाळीव श्वानालासुद्धा त्यांच्याबरोबर जायचे असते. खूप हट्ट केल्यामुळे मग आई-बाबा श्वानाला दुचाकीवरून नेण्याचे ठरवतात. बाबा बाईक चालवतात आणि मागे आई बसते आणि श्वानाला अगदी लहान मुलाप्रमाणे मधोमध बसवतात. श्वानाबरोबर आई-बाबांचा खास प्रवास व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

लाडोबा किती छान गाडीवर बसलाय (Viral Video)

आपण सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहतो, ज्यामध्ये अगदी आपल्या मुलाप्रमाणे पाळीव श्वान आणि मांजरींना ओरडतात, त्यांना खाऊ घालतात आणि आजारी असल्यावर त्यांची काळजीसुद्धा घेतात. तर आज व्हायरल व्हिडीओत पहिल्यांदाच आई-बाबांबरोबर श्वान प्रवास करताना दिसला आहे. तसेच खास गोष्ट अशी की श्वान बाबांना घट्ट पकडून बसला आहे आणि प्रवास करतो आहे. हे प्रवास करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने पाहिले आणि याचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ nusta_jal_या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मागे लागल्यावर घेऊन जावं लागतं, पाळलं आहे म्हटल्यावर हट्ट, लाड पुरवावेच लागतात’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून खूश झाले आहेत आणि ‘खूप लाड करा लाडोबाचे’, ‘नशीबवान आहेस तू बाळा’, ‘लाडोबा किती छान गाडीवर बसलाय ‘, ‘गोंडस’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या व्हिडीओखाली दिसत आहेत.