Viral Video Shows Teacher Demonstrated The Arm Span To Height Ratio In Class : शाळा म्हटले की, शिकविणे आणि शिकणे एवढे दोनच शब्द आपल्याला आठवतात. पण, शाळेतील शिक्षकांना अभ्यासक्रमातील एखादी गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सोप्या व सध्या भाषेत पोहोचवायची असते. त्यासाठी ते अनेक प्रात्यक्षिके वर्गात करून दाखवत असतात. चित्र फळ्यावर रेखाटणे, एखाद्या चार्टनुसार विषय समजावून सांगणे किंवा नाट्य स्वरूपात एखादा धडा, हातवारे करून कविता समजावून सांगणे आदी अनेक गोष्टी शिक्षक आणि शिक्षिका करीत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आर्म स्पॅन-टू-हाईट रेशो (arm span-to-height ratio) समजावून सांगण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) दिल्लीच्या प्राथमिक शाळेतील आहे. आर्म स्पॅन-टू-हाईट रेशो (arm span-to-height ratio बद्दल या व्हिडीओत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे. शिक्षिका सर्वप्रथम स्वतः हे प्रात्यक्षिक करून दाखवते. शिक्षिका वाकून दोन्ही हात पसरवते. त्यातील एक हात ती फळ्यावर, तर दुसरा हात जमिनीवर टेकवते. फळ्यावर हात टेकवला आहे तिथे एक विद्यार्थिनी येऊन खडूने रेष ओढते. असं केल्यावर नक्की काय होतं हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का ?
व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, शिक्षिका वाकून, दोन्ही हात पसरवते आणि एक हात फळ्यावर ठेवते. फळ्यावर जिथे हात आहे तिथे शिक्षिका खडूने चिन्हांकित करण्यास सांगते. त्यानंतर शिक्षिका तिची उंची चिन्हांकित बिंदूशी जुळते हे दाखविण्यासाठी सरळ उभी राहते, तिचे आर्म स्पॅन तिच्या उंचीइतके आहेत हे ती स्पष्ट करून दाखवते. ही संकल्पना एक-टू-वन आर्म स्पॅन-टू-हाईट रेशो म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुरावा म्हणून ती काही विद्यर्थ्यांबरोबरसुद्धा याचे प्रात्यक्षिक करते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sapna_primaryclasses या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. कॅप्शन पाहून अनेक लोकांनी ही ट्रिक माहीत असल्याचे नमूद केले; तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच काही युजर्सन ‘ शरीराची लांबी मोजण्यासाठी आचार्य चरक ही पद्धत वापरायचे’, असेसुद्धा नमूद केले आहे. तसेच अनेक जण कमेंट्समध्ये या ट्रिकचे कौतुक करताना दिसून आले आहेत.