Video Shows Pune Woman Emotional Farewell To A Parrot : निसर्गातील माणसाचा वाढता हस्तक्षेप आणि प्राणी, पक्ष्यांची कमी होत जाणारी संख्या यांबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. पण, बदलत्या काळात माणूस प्राण्यांबरोबरच पक्ष्यांशीही चांगल्या प्रकारे नातेसंबंध जोडू लागला आहे हेही नाकारून चालणार नाही. श्वान, मांजर, लव्ह बर्ड, मासे, पोपट आदी अनेक प्राणी, पक्षी माणूस आपुलकीने घरात आणून, त्यांना कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे वागणूक देत आहे. आजपर्यंत तुम्ही अनेकांची ‘विशेष मैत्री’ पाहिली असेल. पण, पुण्यातील तरुणी आणि तिच्या बाल्कनीत येणारा पोपट ऊर्फ ‘मिठू’ यांची मैत्री सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. त्यांच्या मैत्रीच्या या सुंदर व्हिडीओने (Viral Video) अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरारले आहे.

इन्स्टाग्राम युजर @birdwatching_with_radhika राधिका व्यवसायाने पक्षी निरीक्षक आहे. राधिका पुण्यातून दुसरीकडे स्थलांतरित (शिफ्ट) होणार असते. त्यामुळे ती शिफ्टिंगच्या कामात व्यग्र असते. पण, यादरम्यान खूप दिवसांनी तिच्या बाल्कनीच्या रेलिंगवर तिचा पोपट मित्र ‘मिठू’ येऊन बसतो. खूप दिवसांनी ‘मिठू’ तिला भेटायला आला होता, असे तिचे म्हणणे आहे. तो रेलिंगवर बसलेला असताना तिने त्याच्याशी संवाद साधला, त्याला खाऊ घातले. त्यानंतर तो पोपट राधिकाच्या हातावरून तुरुतुरु चालत तिच्या डोक्यावरदेखील जाऊन बसला. जणू काही राधिकाला निरोप द्यायला तो तिथे आला होता. व्हायरल होणारा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ (Viral Video) एकदा नक्की बघा…

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान

हेही वाचा…वाढदिवसाला चिमुकल्याचा हट्ट, हॅप्पी बर्थडे ऐवजी लावलं ‘हे’ गाणं; पाहा मजेशीर VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

खूप दिवसांनी मिठू आम्हाला भेटायला आला…

हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) राधिकाच्या घरी उपस्थित असणाऱ्या अनोळखी व्यक्तीने शूट केला आहे. तर या खास व्हिडीओला राधिकाने ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाणे बॅकग्राऊंडसाठी वापरले आहे. तसेच “अलविदा दोस्त… आम्ही शिफ्टिंगच्या कामात व्यस्त असताना, खूप दिवसांनी मिठू आम्हाला भेटायला आला. मला वाटतं की, त्याला माझा एकदा शेवटचा निरोप घ्यायचा होता. इतक्या दिवसांनी तो अचानक बाल्कनीत दिसला. इथून जाण्यापूर्वी मी त्याला कधी भेटेन, असे मला वाटले नव्हते. पण, त्याच्या येण्याने मी खूप भावूक झाले; जणू तो मला निरोप द्यायला आला होता. तो गेल्यावर मी विचार करत बसले होते. त्याला कळलं असेल का, मी इथून निघून जाते आहे”, अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @birdwatching_with_radhika या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. काही जण त्यांचे अनुभव शेअर करीत आहेत. एका युजरने, “आता काही इतर शहरांतील पक्ष्यांना राधिकाची गरज आहे. तिने तिचा येथील रोल (भूमिका) पूर्ण केला आहे,” असे कमेंटमध्ये म्हटले आहे. दुसरा युजर म्हणतोय, “हे तुमच्यासाठी खूप कठीण आहे. मिठू तुला नक्कीच मिस करेल.” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader