Viral Video Shows 73 Year Old Lady Driving A Jaguar Sports Car: प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपल्याकडे एक चांगली दुचाकी किंवा चारचाकी असावी. मोठं झाल्यावर मित्रांना गाडी चालविताना पाहून किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन आपण गाडी चालवायला शिकतो. पण, आज सोशल मीडियावर अशा एका आजीबाईंची चर्चा होते आहे; जिने ७३ वर्षांत तिचा गाडी चालविण्याचा छंद जोपासला आहे. कोण आहे ही ७३ वर्षीय आजी? तिचे नाव आहे? तिला कोणत्या गाड्या चालवायला येतात? ती राहते कुठे याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ…
राधामणी असे या ७३ वर्षीय आजीचे नाव आहे; जी केरळची रहिवासी आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद सांगतो आहे की, तिला ड्रायव्हिंगची खूप आवड आहे. राधामणी छंद जोपासण्यासाठी आज जग्वार एफ-टाइप स्पोर्ट्स कार (Jaguar F-Type sports car) चालविताना दिसल्या आहेत. साडी नेसून आणि डोक्यावर टोपी घालून तिने ही स्पोर्ट्स कार चालवली आहे. राधामणी हिने कशा प्रकारे स्पोर्ट्स कार चालवली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्हिडीओची सुरुवात जग्वार स्पोर्ट्स कारची झलक दाखवत सुरू होते. नंतर ७३ वर्षीय आजी ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या दिसत आहेत. तसेच हा व्हिडीओ शूट करण्यासाठी तिच्या बाजूला एक अज्ञात व्यक्तीदेखील बसली आहे. रस्त्यांवर गाडी चालविताना नियमांचे पालन करून, कोणतीही चूक न करता टर्न घेत गाडी चालवताना आजीबाईला पाहून सर्वच थक्क झाले आहेत. इन्स्टाग्रामवर मनिअम्मा – द ड्रायव्हर अम्मा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राधामणी आजीने तिचे व्हिडीओ रिपोस्ट केल्याबद्दल युजर्सचे आभारदेखील मानले.
कार, बससह इतर वाहने चालविणाऱ्या ७३ वर्षीय राधामणी आजी :
राधामणीचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहता हे दिसून येते की, ज्यात ती केवळ कारच नाही, तर बस आणि इतर वाहनेदेखील चालविताना दिसत आहे. तिला ११ परवाने मिळाले आहेत आणि तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंदवले गेले आहे. केरळच्या या आजीला २०२२ सालातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. इतकेच नाही, तर ती या संस्थेची संस्थापकदेखील आहे. तसेच तिचे इन्स्टाग्राम अकाउंट बायो ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनेलची लिंकदेखील दर्शवते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @angoori_babe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे