हा व्हायरल व्हिडीओ पाहून जनतेने डोक्यालाच हात लावलाय! खरं तर, हे दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रस्त्यावर उभी असलेली एक रिक्षा स्वतःच सुरू झालेली दिसून आली आहे. धक्कादायक म्हणजे या रिक्षामध्ये चालक बसलेला नव्हता. चालकाशिवाय ही रिक्षा सुरू झालेली पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे नंतर ही रिक्षा स्वतःच पार्क होते. हे वाचून कचादित सुरूवातीला तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. सोशल मीडियावरल सध्या या व्हायरल व्हिडीओ प्रचंड चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओध्ये आपण पाहू शकतो की, जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू आहे. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा आपोआप सुरू होऊन ती रस्त्याच्या मधोमध जाऊन पोहोचते. रस्त्यावरून ये-जा करणारे लोक सावध होतात आणि आरडाओरड करू लागतात. या रिक्षामध्ये चालक बसलेला नसतानाही आपोआप धावणारी ही रिक्षा पाहून अनेकजण घाबरून गेले. ही रिक्षा चालकाविना कशी काय धावू लागली, असा प्रश्न साऱ्यांनाच पडू लागतो. इतक्यात आणखी एक धक्कादायक दृश्य दिसतं. ही रिक्षा पुन्हा उलटी धावू लागते आणि आपल्या आधीच्या जागेवर येऊन उभी राहते. हा व्हिडीओ पाहून अनेक चक्रावून गेले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले

खरं तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही रिक्षा आधी रस्त्याच्या मधोमध जाऊन जाते, हा अंदाज लावता येतो. पण त्यानंतर ही रिक्षा बरोबर आपल्या आधीच्याच जागी कशी काय येऊन उभी राहते, हे पाहून जनतेला आश्चर्य वाटत आहे. वाऱ्यामुळे ही रिक्षा रस्त्याच्या मधोमध गेली होती तर पुन्हा मागे वळल्यानंतर ही रिक्षा कोणत्याही दिशेला जाऊ शकली असती. पण बरोबर आपल्या आधीच्याच जागी ही रिक्षा उभी राहिली.

आणखी वाचा : किली पॉल आणि बहीण नीमा यांच्यावर सुद्धा अली जफरच्या ‘झूम’ची नशा, नवीन VIRAL VIDEO पाहिला का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माणूसकी अजुनही जिवंत! कारखाली अडकलेल्या बाईक चालकाच्या मदतीला लोकांची गर्दी

हा आश्चर्यकारक व्हिडीओ Lsoccerworld नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरू लागला. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करू लागले आहेत. ‘अशी रिक्षा पाहून इलॉन मस्कला पाहून अभिमान वाटेल.’, असं एका युजरने म्हटलंय. काही युजर्सनी भुत असल्याचं सांगितलं तर काहींनी ही तर ‘टेस्ला’ रिक्षा असल्याचं सांगितलं.