Viral Video of Sambal vadan : संबळ वाजलं आणि तुमची पावलं थिरकली नाही असं कधी होणारचं नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत लोकसंगीताचा ताल अगदी खोलवर मुरला आहे. या तालाला तोलून धरलयं संबळ या वादन प्रकाराने. संबळ वादनात एक विशिष्ट प्रकारचा ताल, लय, असते. या वादनाची सामान्यतः दोन प्रमुख प्रकारांमध्ये वापर केला जातो. पाहिलं म्हणजे संबळ वादन पारंपरिक संगीत कार्यक्रमांमध्ये, विशेषतः लोकसंगीत, लोककला सादरीकरणामध्ये वापरले जाते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ ( Video) व्हायरल होत आहे ; यामध्ये एका चिमुकला उत्कृष्ट संबळ वादन वाजवून दाखवलं आहे.
व्हायरल व्हिडीओ ( Video) गावाकडचा आहे. एक चिमुकला गळ्यात संबळ वादन घालून उभा आहे. व्हिडीओत एक व्यक्ती त्याला ‘असं वाजवं की अंगावर काटा आला पाहिजे, लोकं नाचले पाहिजेत’ असे म्हणताना दिसत आहे. हे ऐकताच चिमुकला हातातील काठ्या घेऊन वाद्य वाजवण्यास सुरुवात करतो. चिमुकल्याला लोकसंगीतआणि लोककलेनं आकर्षित केलं आहे आणि अनेक गोंधळी गीतात वाजणारं संबळाचे चर्मवाद्याच्या आज त्याने सुंदर सादरीकरण केलं आहे. एकदा चिमुकल्याचा कला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…VIDEO: मालकाकडून बाईकचे लाड; सुरी नाही तर चक्क टायरने कापला केक अन्… पाहा कसं केलं सेलिब्रेशन
व्हिडीओ नक्की बघा…
चिमुकल्याकडून जबरदस्त संबळ वादन :
संबळ वादनाच्या वापराने संगीताच्या एका विशिष्ट अंगात लय आणि तालाच्या ताणात एक अनोखा प्रभाव तयार होतो, जो कार्यक्रमाला एक विशिष्ट रूप प्राप्त करून देतो. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा चिमुकला संबळ वादन वाजवण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याचा ताल ऐकून तुमचेही पाय ठेका धरू लागतील. कार्यक्रमात उपस्थित सगळेच जण एकटक चिमुकल्याचा कला पाहताना दिसत आहेत. तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @marathiasmitaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘चिमुकल्याकडून जबरदस्त संबळ वादन, कलेला वय नसते’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चिमुकल्याचे विविध शब्दात कौतुक करताना दिसत आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, ‘भावा तुझ्यासाठी नाचणार’, तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘वाह छोटे उस्ताद लाजवाब’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.