Viral Video Of School Teacher : आपल्यातील अनेकांना अजूनही बँकेत गेल्यावर चेक डिपॉझिट करणे, एटीएममधून पैसे कसे काढायचे याबद्दल माहिती नसते. त्यामुळे आपण अनेकदा बँकेत जाताना एखाद्या व्यक्तीला आपल्याबरोबर घेऊन जातो, ज्याला बँकेत कोणत्या काउंटवर काय करायचे याची अचूक माहिती असते. कारण- अनेकदा बँकेत चेक डिपॉझिट करताना किंवा एखादा फॉर्म भरताना अनेकांची रक्कम, बँक अकाउंट नंबर, स्वतःची माहिती लिहिण्यात तारांबळ उडते. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना बँकेबद्दलच्या काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
एका शाळेतील शिक्षकाला विद्यार्थ्यांना करन्सी आणि बँकिंग सिस्टीमबद्दल शिकवायचे असते. त्याने त्यासाठी वर्गात बँकेसारखा दिसणारा एक सेट-अप तयार केला आहे. त्यानंतर कागद व पुठ्ठ्यांद्वारे दोन ऑफिस आणि एक कॅश काउंटरसुद्धा उभारले आहे. नंतर विद्यार्थ्यांना बनावट पैसे देऊन, त्यांना डिपॉझिट करण्यास सांगितले जाते. त्यासाठी सगळ्यात पहिला त्यांना स्वतःच्या अकाउंटचे नाव, अकाउंट नंबर, किती पैसे भरायचे आहेत व सही याबद्दलची माहिती कागदाच्या बनविल्या गेलेल्या डिपॉझिट स्लिपवर भरावी लागते. त्यानंतर हे पैसे कॅशिअरकडे जमा करायचे असतात. नंतर कॅशिअर पैसे घेऊन डिपॉझिट स्लिपवर एक स्टॅम्प मारून विद्यार्थ्यांना देतो आणि ते पैसे बँकेत जमा केले जातात. तर, वर्गाचे बँकेत कसे रूपांतर केले ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, एकदा पैसे डिपॉझिट केल्यावर बँक इंटरेस्ट (व्याज) देते. हे इंटरेस्ट (व्याज) कसे काढायचे तेसुद्धा शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले. एका विद्यर्थ्याला बिझनेस मॅन (व्यावसायिक)ची भूमिका देऊन. बँकेतून १० टक्के व्याजदराने कर्ज घ्यायला सांगितले जाते. शिक्षक व्याजदरांद्वारे बँक कसे पैसे कमवते हे स्पष्ट करतात आणि व्याज, टक्केवारी, कर्ज यांबद्दलचीही माहिती विद्यार्थ्यांना देताना दिसतात. अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवस्था (banking system) अगदी सोप्या भाषेत समजावताना दिसतात.
अनेक विद्यार्थी यातून शिकू शकतील…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @master_ji21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवस्था (banking system) कशी शिकवली हे व्हिडीओद्वारे शेअर केले आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून शिक्षकाचे कौतुक करीत आहेत. ‘प्रॅक्टिकल ज्ञान खूप महत्त्वाचे असते, भारताला अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे, कृपया याचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करा, अनेक विद्यार्थी यातून शिकू शकतील’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.